कन्हय्या साळवे यांच्या घरावर टोळक्‍याकडून दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नाशिक रोड - माजी नगरसेवक कन्हय्या साळवे यांच्या जेल रोड येथील घरावर २० ते २५ युवकांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दगडफेक करून कार व दुचाकीची तोडफोड केली. टोळक्‍याने एकलहरे रोडवरील पानदुकान चालकावर प्राणघातक हल्ला केला. याबाबत उपनगर व नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पूर्ववैमनस्यातून दोन्ही हल्ले झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

कन्हय्या साळवे यांचा आरंभ महाविद्यालयाशेजारी कंथक हा बंगला आहे. बुधवारी (ता. १८) सायंकाळी सातच्या सुमारास साळवे बाहेरून आल्यावर वरच्या खोलीत आरामासाठी गेले. गेटमध्ये त्यांचा मुलगा आशिष व मित्र उभे होते. त्याच वेळी तलवारी, कोयते, हॉकी स्टिक घेऊन दुचाकींवर २० ते २५ युवक आले. त्यांनी प्रथम साळवे यांच्या सियाझ सुझुकी कारच्या (एमच १५- जीडी ९९९२) काचा फोडून आत बिअरच्या बाटल्या टाकल्या. नंतर दुचाकीची (एमएच १५- ईडब्लू १६०२) मोडतोड केली. नंतर त्यांनी आशिषवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी साळवे कुटुंबातील संगीता साळवे यांनी एका हल्लेखोराचा शर्ट पकडला. नागरिक जमा होऊ लागल्याने हल्लेखोर फरारी झाले. हल्ल्याची वार्ता समजताच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले. उपनगरचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

साळवे यांच्या घरावर हल्ला करण्याआधी सातच्या सुमारास एकलहरे रोडवरील गजानन थोरात (वय २९) यांच्या पानदुकानावर टोळक्‍याने र हल्ला केला. हल्लेखोर पळून गेल्यानंतर उपस्थित नागरिकांनी गजानन थोरातला जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याला अतिदक्षता विभागात हलविले. नाशिक रोडचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे सहकाऱ्यांसह दाखल झाले. हॉस्पिटलसमोर नागरिकांनी गर्दी केली होती.

Web Title: stones throw Kanhaiya Salve house