कुपोषण मुक्तीसाठी ग्राम बालविकास केंद्राचे उद्घाटन

thengoda
thengoda

ठेंगोडा (नाशिक) : नाशिक जिल्हा कुपोषणमुक्त व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी सुरु केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ठेंगोडा (ता.बागलाण) येथे काल (ता.13) रोजी ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्यात आले आहे. 

सरपंच सखुबाई शिंदे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करून कुपोषित बालकांना आहार वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अंजनाबाई पगार, ग्रामपंचायत सदस्य भिका वाघ, गोरख सोनवणे, प्रदीप शेवाळे, मधुकर व्यवहारे, पर्यवेक्षिका पी.एच.अहिरे आदी उपस्थित होते. कुपोषण निर्मुलनासाठी जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी कुपोषण व बाल मृत्युचे प्रमाण कमी व्हावे, भविष्यातील सुदृढ पिढी निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी सकारात्मकतेने प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर संपूर्ण जिल्हाभर कुपोषण मुक्त अभियान सुरु झाले आहे. यासाठी सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदेची यंत्रणा यांच्या सहकार्याने तसेच गावपातळीवर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्ययंत्रणा, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावात ग्राम बालविकास केंद्र सुरु झाली आहेत. याचाच भाग म्हणून ठेंगोडा गावात केंद्राची सुरवात करण्यात आली.

ग्राम बालविकास केंद्र कशा पद्धतीने राबवायचे याबद्दल अंगणवाडी सेविकाना प्रशिक्षण देण्यात आले असून याद्वारे कुपोषित बालकांना आहार व औषधोपचार करण्यात येणार आहेत. या आहारात अंडी, केळी, उकडलेली बटाटे, मोड आलेली धान्य, अमायलेयुक्त पिठाचा शिरा, लापसी, उपमा, शेगदाणे, तेल व तीळ यांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच औषधात लोहवर्धक औषध, कल्शियम औषधे पुरविण्यात येणार आहेत. यावेळी गणेशनगर, एकलव्य नगर, ठेगोडा १, दरी याठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंत शिंदे, शांताराम वाघ, वैभव पाटील, प्रकाश पगार, रामसिंग ठोके, आरोग्य सेविका दीपिका बच्छाव, अंगणवाडी सेविका इंदूबाई बोरसे, लता खैरनार, आशा पवार, अंजनाबाई मांडवडे, वैशाली वाघ, वैशाली पगार आदींसह महिला उपस्थित होत्या.

कुपोषण मुक्ती साठी सर्वानी सहभाग घेऊन प्रामाणिकपणे काम करून भविष्यातील सशक्त युवक निर्माणासाठी या अभियानाकडे सकारात्मकतेने बघावे.                    
- सरपंच सखुबाई शिदे ठेंगोडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com