तळवाडे दिगर येथे कुपोषण निर्मूलनासाठी ग्राम बालविकास केंद्राचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून कुपोषणमुक्त बालक उपक्रमाला काल बुधवार (ता.13) रोजी सुरुवात करण्यात आली. सरपंच दीपक पवार व उपसरपंच देविदास आहिरे यांच्या हस्ते ग्राम बालविकास केंद्राचे उद्घाटन करून सुरुवात झाली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होत आहे. कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गीते यांनी कुपोषण मुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावातील अंगणवाडीत ग्राम बालविकास आहार व औषधोपचार आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली देण्यात येणार आहे. एक ते सहा वर्षापर्यंतच्या लाभार्ती बालकांना दारोदार वेळापत्रकाप्रमाणे आहार,औषधे व निगा राखण्याचे काम गावातील अंगणवाडी सेविकामार्फत केले जाणार आहे.

यावेळी सरपंच दीपक पवार, उपसरपंच देविदास आहिरे, ग्रामसेवक आर.जे.आहिरे, कपालेश्वर बीट 2 च्या पर्यवेक्षिका अर्चना साबळे, जयश्री भामरे, जिजाबाई आहिरे, उषा ठाकरे, अरुणा सावकार, वंदना देसले यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Web Title: to stop malnutrition inauguration of gram balvikas kendra in talwade digar nashik