Nandurbar Rain Damage : तळोदा तालुक्यात 2 तास वादळी पाऊस; शेकडो घरांचे नुकसान

Taloda: School papers were blown away due to stormy winds, sodden grain, educational materials were bent and electric pole came to the road. Damage to house due to winds.
Taloda: School papers were blown away due to stormy winds, sodden grain, educational materials were bent and electric pole came to the road. Damage to house due to winds. esakal

Nandurbar News : तळोदा शहरासह तालुक्यात रविवारी (ता. ४) अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने होत्याचे नव्हते केले आहे. सकाळी दहा ते दुपारी बारा असे दोन तास चाललेल्या या वादळी थैमानात शेकडो घरांचे नुकसान झाले, तर असंख्य झाडे उन्मळून पडली.

या वादळात तळवे (ता. तळोदा) येथील एका कुटुंबातील सदस्य बालबाल बचावले आहेत. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांची दाणादाण उडाली, तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ठिकठिकाणी वीजखांब वाकल्याने, वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. (Stormy rain for two hours in Taloda Taluka Hundreds of houses damaged families in Talwa escaped unharmed Nandurbar News)

तालुक्यातील नागरिक उन्हामुळे चांगलेच हैराण झाले होते व पावसाळ्याची वाट पाहत होते. दरम्यान, गुजरातमध्ये अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे तळोदा शहरासह तालुक्यातील ठिकठिकाणी रविवारी सकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत सोसाट्याचा वारा सुटला.

अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट झाला. यादरम्यान पावसाचा जोर कमी असला तरी दोन तास चाललेल्या वादळी वाऱ्यांच्या थैमानात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खर्डी बुद्रुक, लक्कडकोट, केलवापाणी, कोठार, गढीकोठडा, सावरपाडा, धनपूर, रानापूर, राणिपूर, बंधारे, वाल्हेरी, इच्छागव्हाण, ढेकाटी तसेच तळवे, तऱ्हाडी, बोरद परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

वादळाची तीव्रता जास्त असल्याने घराचे कौल, पत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर आला. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले, यामुळे वीजपुरवठादेखील खंडित झाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली, त्यात वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने नागरिक चांगलेच धास्तावले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Taloda: School papers were blown away due to stormy winds, sodden grain, educational materials were bent and electric pole came to the road. Damage to house due to winds.
Nashik Accident News : अपघातात जखमी वारकऱ्याचा मृत्यू

वादळी वाऱ्यांमुळे तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे अक्षरशः २०० मीटर अंतरावर फेकले गेले. शाळेचे नुकसान होत विद्यार्थ्यांसाठी असलेले धान्य, पुस्तके, कागदपत्रे आदी पाण्यात भिजले.

सावरपाडा येथील बबन भीमसिंग पाडवी, बोंडा गोमऱ्या मोरे, वसंत तिरसिंग पवार तसेच तऱ्हाडी येथील कैलास कोळी आणि ढेकाटी येथील रवींद्र पाडवी व विनायक पाडवी यांच्या घराचे पत्रे उडून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

त्याचबरोबर तळवे येथे वादळी वाऱ्यामुळे किशन ठाकरे व अनिता ठाकरे यांचे घर झाडाखाली दाबले गेले. त्या वेळी घरात सागर ठाकरे (वय १६), अनिता ठाकरे (३५), रोहित ठाकरे (१९) व कमलाबाई ठाकरे हे चार जण होते. सुदैवाने ते बालबाल बचावले असून, स्थानिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वादळामुळे शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाले.

Taloda: School papers were blown away due to stormy winds, sodden grain, educational materials were bent and electric pole came to the road. Damage to house due to winds.
Nandurbar Rain Update : नंदुरबार जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा; वादळी वाऱ्यांमुळे गेला एकाचा जीव

आमदार राजेश पाडवींची तत्परता

आमदार राजेश पाडवी यांनी लागलीच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन जखमी झालेल्या तळवे येथील कुटुंबाची विचारपूस केली. तसेच तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांना सूचित करून पंचनामा करण्याचे आदेश दिले.

आमदारांनी विद्युत विभागाच्या उपअभियंता यांच्याजवळ संपर्क साधून, त्यांना वाकलेले वीजखांब व तुटलेल्या वायरींची तत्काळ दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या.

Taloda: School papers were blown away due to stormy winds, sodden grain, educational materials were bent and electric pole came to the road. Damage to house due to winds.
Nashik News : शिक्षकांच्या वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा सुरू; या तारखेपर्यंत नोंदणीस मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com