सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देणारी ताकद फक्त शिवसेनेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

नाशिक - खऱ्या अर्थाने जो प्रामाणिक व निष्ठावान आहे, ज्याला समाजाबद्दल काहीतरी करण्याची इच्छा आहे, संघटनेतील अथवा सत्तेतील कार्यकर्त्यास वरिष्ठ पद देण्यास कुठलाही भेदभाव न करता देणारी फक्त शिवसेना एकमेव आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता. २) येथे केले. कार हबच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.  

नाशिक - खऱ्या अर्थाने जो प्रामाणिक व निष्ठावान आहे, ज्याला समाजाबद्दल काहीतरी करण्याची इच्छा आहे, संघटनेतील अथवा सत्तेतील कार्यकर्त्यास वरिष्ठ पद देण्यास कुठलाही भेदभाव न करता देणारी फक्त शिवसेना एकमेव आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता. २) येथे केले. कार हबच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.  

ऑल इंडिया कार डीलर असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक रमेश धोंगडे यांच्या ‘कार हब द स्पाइनिंग व्हिल्स ऑटो केअर’चे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. २) झाले. महापौर अशोक मुर्तडक, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, राष्ट्रीय ऑल इंडिया कार डीलर असोसिएशनचे अध्यक्ष जे. एस. नेयोल, निनाद निखाडे, कार किंगचे अध्यक्ष सुशील ललवाणी, नगरसेवक सूर्यकांत लवटे, डी. जी. सूर्यवंशी, अशोक सातभाई, राजू लवटे, प्रकाश लोंढे, दीपक बलकवडे, सत्यभामा गाडेकर, सुनंदा पेखळे, नंदराम पेखळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुरवातीला श्री. निखाडे यांच्या हस्ते कार हबचे उद्‌घाटन झाले. अभिजित धोंगडे, अभिजित पेखळे, महेश राजपूत, अमोल सहाणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. 

श्री. नेयोल म्हणाले, की स्वयंरोजगातील सूक्ष्म संधी शोधून युवकांनी रोजगारनिर्मिती करावी. शोरूममध्ये दिल्या जाणाऱ्या सेवेपेक्षा अधिक चांगली सेवा ज्याप्रमाणे नवीन गाडी घेताना दिली जाते, तशीच सेवा जुनी गाडी घेताना दिली जाते, अशा संधीचा शोध घेणे आवश्‍यक आहे. या वेळी श्री. मुर्तडक, श्री. गोडसे, श्री. करंजकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रफुल्ल बोंडे, सागर कर्पे, महेश जोशी, जयंत जाचक आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

मेट्रोसिटीसारख्या शहरातील कार मॉलच्या धर्तीवरच नाशिक शहरातही आम्ही संघटनेच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाने ग्राहकांना दर्जेदार, उत्कृष्ट व तत्पर सेवा देण्यास कटिबद्ध आहोत.
- रमेश धोंगडे, उपाध्यक्ष, ऑल इंडिया कार डीलर असोसिएशन, महाराष्ट्र

Web Title: The strength of that support common Shiv Sena workers only