वृक्षांच्या वाढदिवसासोबत साजरा केला विद्यार्थ्याने अनोखा वाढदिवस!

प्रा भगवान जगदाळे
सोमवार, 9 जुलै 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी अनुराग भगवान जगदाळे याने आपल्या १५ व्या वाढदिवसानिमित्त बचत केलेल्या खाऊच्या पैशांतून रोजगाव (ता. साक्री) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नुकतेच शालेय शैक्षणिक साहित्य व अल्पोपहार वाटप केले.

वृक्षारोपणासह वृक्षांचाही वाढदिवस साजरा केला. जैताणेचे सरपंच संजय खैरनार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक मोहन वेंडाईत, बापूजी जगदाळे, शुभांगी खैरनार, एकनाथ भिल आदी उपस्थित होते.

गेल्या वर्षीही अनुरागने वाढदिवसानिमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड. शरदचंद्र शाह, सरपंच संजय खैरनार, बापूजी जगदाळे आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासह शेतात पाच वृक्षांचे रोपण केले होते. त्यापैकी त्याने स्वतः चार वृक्ष जगवले. जगवलेल्या चारही वृक्षांचा यावेळी पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. अनुरागच्या हस्ते त्या वृक्षांचे पूजन झाले. पाचपैकी एक वृक्ष न जगल्याने त्याऐवजी अनुरागने वाढदिवसानिमित्त दोन अतिरिक्त वटवृक्षांचेही रोपण केले. मान्यवरांसह सालदाराच्या हस्ते वृक्षारोपण करून एक नवा पायंडा पाडला.

यावेळी सरपंच संजय खैरनार, मुख्याध्यापक मोहन वेंडाईत आदींनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही या विधायक व अनोख्या उपक्रमास भरभरून दाद दिली. सरपंच संजय खैरनार, मुख्याध्यापक मोहन वेंडाईत यांच्यासह आशुतोष जगदाळे, अनुराग जगदाळे, विवेक जगदाळे, शुभांगी खैरनार, एकनाथ भिल आदी उपस्थित होते. प्रा. भगवान जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: student birthday celebrates with tree at nijampur jaitane