समाजकल्याणच्या वसतीगृहात विद्यार्थिनीची आत्महत्त्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नाशिक : नाशिक-पुणे रोडवरील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतीगृहामध्ये आज दुपारी एका विद्यार्थिनींने गळफास लावून घेत आत्महत्त्या केल्याचा प्रकार घडला. गौरी एकनाथ चव्हाण (मूळ रा. औरंगाबाद) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून तिच्याजवळ मृत्युपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, गौरी एकनाथ चव्हाण हिने आज दुपारी एक वाजेपूर्वी कधीतरी वसतीगृहातील खोलीमध्ये गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. सदरची बाब लक्षात येताच मुंबई नाका पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये तिच्याकडून मृत्युपूर्वी चिठ्ठी सापडली असून त्यात प्रेमप्रकरणातून आत्महत्त्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गौरी चव्हाण ही नर्सिंगचे शिक्षण घेत होती. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात नोंद करण्याचा काम सुरू होते परंतु पोलीस वा वसतीगृह प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली गेलेली नाही.

Web Title: student suicide in samajkalyan hostel