येवल्याची पोरं लय हुश्शार! 142 विशेष प्रविण्यासह तर 1600 विद्यार्थी प्रथम श्रेणीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

यंदा विज्ञान शाखेसोबतच कला व वाणिज्य शाखेने बाजी मारली आहे. नेहमीच पहिला क्रमांक सांभाळणाऱ्या शहरातील विद्यालयाशी बरोबरी करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही बाजी मारली आहे.

येवला : तालुक्यातील बारावीच्या परीक्षेला बसलेल्या ३ हजार ६३५ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १४२ विशेष प्रविण्यासह तर १ हजार ५९५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण झाले. तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे फक्त ३७९..यामुळे विद्यार्थी अधिकच गुणवान झाल्याचे दिसतेय. तालुक्याचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत दीड टक्के घटला असून, ८९.६२ टक्के लागला आहे. 

तीन वर्षांपूर्वी बारावीच्या परीक्षेत निकालाचा टक्का ८१ टक्के तर मागील दोन वर्षांत अनपेक्षित समाधानकारक वाढ होऊन ९० टक्क्यांदरम्यान लागत आहे. यावर्षी २२ कनिष्ठ महाविद्यालयातून तालुक्यातील ३ हजार ६३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १४२ विशेष प्राविण्य,१ हजार ५९५ प्रथम श्रेणीत,१ हजार ४८७ द्वितीय श्रेणीत तर ३४  पास श्रेणीत असे ३ हजार २०२ उत्तीर्ण झाले आहेत.

यंदा विज्ञान शाखेसोबतच कला व वाणिज्य शाखेने बाजी मारली आहे. नेहमीच पहिला क्रमांक सांभाळणाऱ्या शहरातील विद्यालयाशी बरोबरी करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही बाजी मारली आहे.

शहरातील स्वामी मुक्तानंद व एक्झोकेमच्या विध्यार्थ्यानी गुणांचे मजले पार केले शिवाय बाभूळगाव येथील संतोष ज्यू. कॉलेज,अंदरसूल येथील मातोश्री एस.जी.सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय तसेच रहाडी,राजापूर,एरंडगाव,सायगाव,अनकाई शाळांचा निकाल नेहमीप्रमाणे दर्जेदार लागला आहे.

येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयाचा एकूण निकाल ८७.८१ (विज्ञान-९९.४३,कला-६२.३७,वाणिज्य -९२.९०),
एन्झोकेम विद्यालयाचा ८९.७१ (विज्ञान-९९.३१,कला-५७.२५,वाणिज्य - १००),

जनता विज्ञान विद्यालयाचा ९७.८७ टक्के व कला वाणिज्यचा ७३.८८ (कला-६२.९३,वाणिज्य -९३.७५), अंगलो उर्दूचा कलेचा ७३,बाभूळगावचा एकत्रित ९६.६० (विज्ञान-९९.६,कला-८३.८७), एस.एन.डी.महाविद्यालयाचा ८१.५९ (विज्ञान-८६.४८,कला-७१.१५), एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचा ८४.२१, नगरसूल येथील न्यू इंग्लिश स्कूलचा ९६.०५,पाटोदा जनता विद्यालयाचा एकत्रीत ९१.५४ (विज्ञान-९८.१८,कला-८५.३९),राहडीच्या संतोष विद्यालयाचा ९७.६७ (विज्ञान-१००,कला-९०.२४) तर जळगाव नेऊरचा ९४.८७ टक्के,सावरगाव न्यू इंग्लिश स्कूलचा ९५.१६,नगरसूल किमान कौशल्य स्कूलचा ९१.८३, तर राजापूर येथील माध्यमिक विद्यालयाचा ९३.१०,अंदरसुल येथील मातोश्री सोनवणे विद्यालयाचा ८८.६४ (विज्ञान-१००,कला-५७.५०,वाणिज्य -९४.०२).

येवला उर्दूचा ९३.५४,राजापूरच्या गणाधीसचा विज्ञान,कला,वाणिज्य शाखांचा १०० टक्के,सायगवाच्या सरस्वती विद्यालयाचा १००,भाटगावच्या विश्वलताचा ४२.८५अनकाईच्या सोनवणे ज्यू.कॉलेजचा ८३.३३,कांचन सुधाचा ९६.९६ तर विज्ञान शाखेचा ९५.८३ टक्के निकाल लागला आहे. या सर्व निकालाची टक्केवारी पाहता सर्व विद्यार्थी खूपच हुशार झाल्याचे दिसतेय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student of Yevla are Smart Tops in HSC Exams