स्पर्धा परीक्षेसाठी बसु न दिल्याने विद्यार्थ्यांनी केली पोलिसात तक्रार

राजेंद्र बच्छाव
रविवार, 3 मार्च 2019

दिरानगर (नाशिक) : आज वित्त विभागाच्या कोषागार विभागातील कनिष्ठ लिपिक पदासाठी झालेल्या ऑनलाईन परीक्षेला निर्धारित वेळेत न आल्याचे कारण देत 20 ते 25 जणांना परीक्षेस बसु न दिल्याने मोठा गोंधळ उडाला. वडाळा पाथर्डी रस्त्यावर असलेल्या गुरुगोविंद सिंग महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी आणि निलेश साळुंखे यांनी संबंधित विद्यार्थ्यांना सोबत घेत इंदिरानगर पोलीस ठाण्यात याबाबत रीतसर तक्रार दिली आहे.
 

इंदिरानगर (नाशिक) : आज वित्त विभागाच्या कोषागार विभागातील कनिष्ठ लिपिक पदासाठी झालेल्या ऑनलाईन परीक्षेला निर्धारित वेळेत न आल्याचे कारण देत 20 ते 25 जणांना परीक्षेस बसु न दिल्याने मोठा गोंधळ उडाला. वडाळा पाथर्डी रस्त्यावर असलेल्या गुरुगोविंद सिंग महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली. शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी आणि निलेश साळुंखे यांनी संबंधित विद्यार्थ्यांना सोबत घेत इंदिरानगर पोलीस ठाण्यात याबाबत रीतसर तक्रार दिली आहे.

काल (ता.2) याच पदाच्या पहिल्या पेपरला देखील याच कारणांमुळे परीक्षा देता आली नाही. आजच्या परीक्षेची वेळ सकाळी 10 ची होती. त्यासाठी 9.30 ला हजर होणे आवश्यक होते. परीक्षार्थी विष्णूचरण पचलोटे, शिवानंद तुपकर, विवेक माळी, राजेंद्र कातकाडे, मंजुषा शिरसाठ, स्नेहल गायकवाड, मनोज पगार, विशाल मोगल, अर्जुन श्रीवास्तव, माधुरी गायकवाड, शितल घुले आदीच्या म्हणण्यानुसार,  ''ते सकाळी ९:१५ पासून गेटवर उभे होते. मात्र, सिक्युरिटी यांनी आत सोडले नाही. विद्यार्थी विचारले असता आम्हाला अजून आदेश आला नाही असे सांगितले. केंद्र प्रमुख देखील नव्हते. विध्यार्थी आता सोडण्यात यावे यासाठी मागणी करत असताना पोलीसांना पाचारण करण्यात आले व गदारोळ सुरू झाला. इतर विध्यार्थी या वर्गातून त्या वर्गात फिरत होते. कॉम्पुटर मिळत नव्हते.

शिवसेनेच्यावतीने बिरारी आणि साळुंखे यांनी देखील विनंती केली मात्र, या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देण्यात आले नाही आणि त्यांना गेट बाहेर काढण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांची भेट घेतली आणि रीतसर तेथे तक्रार दाखल करण्यात आली. पाटील यांनी देखील संबंधितांना तुमच्याबाबत येथे तक्रार अर्ज आला असून या विद्यार्थ्यांच्या म्हणण्याची शहानिशा करण्यासाठी त्या ठिकाणच्या सर्व सीसीटीव्ही फुटेज आदी बाबी दाखवण्यात याव्यात असे सूचित केले आहे.

दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या नुकसानीची माहिती आणि तक्रार जिल्हाधिकार्याकडे देखील करण्यात येणार असून त्यासाठी धुळे, बुलढाणा, अकोला, निफाड आदी भागातून आलेले हे सर्व विद्यार्थी त्यासाठी येथेच नातेवाईकांकडे थांबणार आहेत. प्रतिक्रिया विवेक माळी (परीक्षार्थी) सुरक्षारक्षक नऊ 35 पर्यंत विद्यार्थ्यांना आत सोडले असे सांगत होते. मात्र,  मी प्रत्यक्ष तिथं नऊ 25 पासून उपस्थित होतो. मी सीसी टीव्ही फुटेज बघावे अशी वारंवार विनंती केली. मात्र, कोणतीही सबब ऐकून न घेता तुम्ही उशिरा आला आहेत हे कारण देत गेट बाहेर काढून दिले. परीक्षेचा पेपर देता न आल्याने सर्व केलेली तयारी वाया गेली आहे. त्यामुळे मोठा मनस्ताप होत आहे. आमच्यावर झालेला हा अन्याय दूर करत या परीक्षेची पुन्हा एकदा संधी मिळाली पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The students complained to the police for not giving a enter to the competition