अथक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना मिळाली लालपरी

Students get red with tireless efforts
Students get red with tireless efforts

कोठरे खुर्द : नाशिक, अंबासन, येथील विद्यालयात मालेगाव तालुक्यातील कोठरे खुर्द व बुद्रुक येथील विद्यार्थ्यांना जा-ये करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. अनेक वेळा आगारप्रमुखांना निवेदने देऊनसुध्दा हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात होते. विद्यालयात नव्यान रूजू झालेले मुख्याध्यापक एच.एम.सोनवणे यांनीही निवेदन दिले. जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी निवेदनाची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांची होत असलेली हेळसांड थांबवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत सटाणा आगारप्रमुख उमेश बिरारी यांच्याशी चर्चा करून बस सुरू केली. गुरव व आघाराप्रमुख बिरारी दोन्हीही आमच्यासाठी देवदूत धावून आल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

येथील विद्यालयाची स्थापना 12 जुन 1967 मध्ये झाली. या विद्यालयात कोठरे खुर्द व बुद्रुक येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. विद्यालयात येण्यासाठी तब्बल पाच ते सहा किलोमीटर पायपीट करून यावे लागत होते. विद्यालयाने व ग्रामस्थांनी अनेक वेळा मालेगाव आगाराकडे बससाठी मागणी केली. मात्र आगाराकडून हद्दीचा मुद्दा देत उडवाउडवीची उत्तरे देण्यातच धन्यता मानत होते. वडणेर खाकुर्डी पोलिसांनीही सहकार्य केले नसल्याचे बोलले जाते. विद्यार्थ्यांनी व पालकांनी बससाठी रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेण्यासाठी सटाणा आघाराकडे व जायखेडा पोलिस ठाण्यात निवेदन दिले असता सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी तात्काळ दखल घेत आगारप्रमुख उमेश बिरारी यांच्याशी संपर्क साधला असता बिरारी यांनीही विद्यार्थ्यांची होत असलेली पायपीट थांबवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत तातडीने बस सुरू करण्याचे आदेश दिले.

गुरूवारी (ता.23) सकाळी अकराच्या सुमारास बस कोठरे गावात पोहचली व एकच जल्लोष केला. ग्रामस्थांनी चालक व वाहकाचा सत्कार करून आलिंगन घातले. बस गावात आल्याने अनेक विद्यार्थ्यांना आनंदाश्रूंनी भांबावून गेले होते. बस नव्या नवरीगत नारळाच्या फांद्या व फुलांनी सजविण्यात आली होती. विद्यार्थ्यांना घेऊन अंबासन येथे आल्यानंतर जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या हस्ते बसचे पुजन करून श्रीफळ वाढविले. मुख्याध्यापक एच.एम.सोनवणे यांनी आघाराप्रमुख उमेश बिरारी व सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांचे आभार मानले. यावेळी जणू आपल्यांसाठी एक देवदूतच धावून आल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त करून दाखविली. 

गेल्या अनेक वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता कोठरे येथील विद्यार्थी पाच ते सहा किलोमीटर पायपीट करून येत होते. अनेक निवेदने सदर माहिती दिली मात्र हद्दीचा मुद्दा पुढे येत होता. जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव व आघाराप्रमुख उमेश बिरारी यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने बस सुरू झाली.
- एच.एम.सोनवणे, मुख्याध्यापक, अंबासन.

पालक व विद्यार्थ्यांनी निवेदन दिले होते. विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी खडतर प्रवास विद्यार्थ्यांना करावा लागत होता. पुर्वींच परिवहन मंडळाची बस विद्यार्थ्यांसाठी सुरू करणे गरजेचे होते. 

- गणेश गुरव, सहाय्यक पोलिस निरीक्षक जायखेडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com