तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वकर्तुत्वाचा आनंद!

soygav.jpg
soygav.jpg

सोयगाव : तंत्रस्नेही महाराष्ट्र घडत असताना शिक्षकांसोबत तंत्रस्नेही विद्यार्थी घडणं खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच तालुक्यातील माळीनगर शाळा दरवर्षी पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी तंत्रस्नेही कार्यशाळा आयोजित करीत असते. राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्री यांची जयंती आणि स्वच्छता अभियानाचा शाळा स्तरावर कार्यक्रम घेत तंत्रस्नेही कार्यशाळेच्या विविध बाबी विद्यार्थ्यांनी आज (ता.२) जाणून घेतल्या.

तंत्रज्ञानाबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली

या कार्यशाळेत तंत्रस्नेही साधनांची ओळख व वापर, संगणक, लॅपटॉप, टॅब, मोबाईल, प्रिंटर्स, स्पिकर्स, आदी बाबीचा अभ्यास करण्यात आला. तसेच पाठ्यपुस्तकातील विविध घटकांची माहिती जाणून घेण्यासाठी ॲप डाऊनलोड, क्यूआर कोड स्कॅन कसा करावा,  उपयोग कसा करावा, बोलो अँप, हॅलो इंग्लिश, स्पोकन इंग्लिश अँप, रीड टू मी या इंग्रजी सॉफ्टवेअरचे महत्त्व आणि वापर, मतदार जागृती अभियान वोटर अँप, ग्रीन आर्मी अँप, ऑनलाइन बँकिंगचे महत्त्व आणि ओळख, ॲग्रोवन, किसान ॲप या शेतीविषयक ॲप्सचे महत्त्वही यावेळी सांगण्यात आले. या वेळी मराठी, इंग्रजी, गणित, चित्रकला, आरोग्यविषयक विविध ॲप्सची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.
 

तंत्रस्नेही साधनांचा वापर आवश्यक तितकाच करा

विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य वाढावेत या करिता ब्लेंड कोलाज,पिकसर्ट या फोटो इडिटर ॲप्सचे व व्हिडिओ निर्मितीकरिता आवश्यक असलेले काईन मास्टर, व्हिवा व्हिडिओ, स्लाईड शो, शो मेकर या ॲप्सची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध शैक्षणिक इमेजेस तयार करत सोबतीने शिकण्याचा आनंद लुटला. तंत्रस्नेही साधनांचा तसेच मोबाइलचा वापर आवश्यक तितकाच करून कोणताही गेम खेळू नका, विविध शैक्षणिक ॲप्सचा गरज असेल तेव्हा व योग्य तितकाच वापर करा, समृद्ध व्हा असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानाजी बागुल, राजेंद्र सोनवणे, अशोक सोनवणे व मुख्याध्यापक राजेंद्र बधान उपस्थित होते.

प्रतिक्रिया 
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन शिकल्याचा,नवीन माहिती मिळाल्याचा आनंद  दिसत होता. तांत्रिक बाबींवर मात करत आजची चौथी तंत्रस्नेही कार्यशाळा मोठ्या उत्साहानं पार पडली. शिक्षक भरत पाटील हे शाळेत नवनवीन उपक्रम घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमीच नवीन शिकण्याची उमेद येते.
- नानाजी बागुल, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com