Students Nutrition : विद्यार्थ्यांच्या आहारातली अंडी गायब; बालविकास विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eggs

Students Nutrition : विद्यार्थ्यांच्या आहारातली अंडी गायब; बालविकास विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

वडाळी : राज्यातील १६ आदिवासी ​जिल्ह्यांतील अनुसूचित क्षेत्रात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गर्भवती ​​महिला व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देणारी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू असली, तरी शहादा तालुका बालविकास विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या आहारातून अंडी तीन महिन्यांपासून गायब झाली आहेत.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

गर्भवती ​​महिला व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देणाऱ्या भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शिजवून पूरक पोषण आहार देणे आवश्यक आहे. सध्या हिवाळा सुरू असून, अंड्यात उष्मांक जास्त असतो. त्यामुळे त्याची गरज हिवाळ्यात अधिक असते. या योजनेची अंमलबजावणीदेखील जिल्ह्यासह शहादा तालुक्यात सुरू झाली.

हेही वाचा: Astro Tips for Students : परीक्षा तोंडावर आल्यात अन् अभ्यास होईना? मग 'हे' उपाय करा

तालुक्यातील स्तनदा माता, गर्भवती महिलांच्या आहारात उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे या ​स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कुपोषित बालके जन्माला येत असतात, हे प्रमाण कमी व्हावे या हेतूने अमृत आहार योजना सुरू करण्यात आली. कुपोषणाचे आदिवासी समाजामध्ये प्रमाण जवळपास ३३ टक्के आहे. आदिवासी महिलांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात, हे अनेक संशोधन तसेच अभ्यासावरून सिद्ध झाले आहे.

गर्भवती अवस्था व स्तनदा माता यांना पूरक पोषण आहारासाठी गहू, तांदूळ, अंडी, सोयाबीन, पालेभाज्या, आयोडिनयुक्त मीठ, गूळ आदी पूरक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येते. अपुरा आहार तसेच गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी याबाबत आदिवाची समाजामध्ये आवश्यक जागरूकता दिसून येत नाही. शेवटच्या तिमाहीमध्ये बाळाचा विकास व वाढ होते. अशा कालावधीतही गर्भवती ​महिला श्रमाची कामे करत असतात. त्या कालावधीत त्यांना अतिरिक्त आहार आणि विश्रांतीची गरज असते.

हेही वाचा: School Nutrition Inspection : ‘शालेय पोषण’ची तपासणी होणार

गावपातळीवर सक्रिय समितीची गरज

गावपातळीवर अमृत आहार योजनेतील महिलांना चौरस आहार देण्यात यावा, यासाठी ग्रामसभेकडून आहार समितीच्या अध्यक्षांची निवड करणे आवश्यक आहे. या समितीवर एक गर्भवती महिला तसेच स्तनदा मातेचीही निवड करण्यात यावी अशी तरतूद आहे. गहू, तांदूळ, अंडी, सोयाबीन, पालेभाज्या, आयोडिनयुक्त मीठ, गूळ आदींची खरेदी या समितीद्वारे करण्यात यावी जेणेकरून लाभार्थ्यांचा आहाराचा दर्जा, स्वच्छता यावर देखरेख करता येईल.

हेही वाचा: Gree Peas Nutrition : हिवाळ्यात मटार खाण्याचे 'हे' फायदे माहितीयेत का?

अंडी नाहीत तर बालकांची उपस्थितीही नाही

अंडे मिळत नसल्याने बालकांच्या उपस्थितीवरदेखील परिणाम झाला आहे. अंगणवाडी केंद्रात लहान बालकांना कुपोषणमुक्तीसाठी पूरक पोषण आहार दिला जातो. यातील मुलांना आहारवाटप केला जातो. अंगणवाडीत अंडी मिळाली तर बालकांच्या उपस्थितीत वाढ होत राहते, पण बालकांना अंडी मिळत नसल्याने त्याचा थेट परिणाम उपस्थितीवर होत असून, काही वेळा स्वतः खर्च करूनदेखील आहार पुरविला जात असल्याचे अंगणवाडीसेविकांनी सांगितले आहे.