बसअभावी विद्यार्थ्यांची रोजच दहा किलोमीटर पायपीट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

धुळे - गेल्या चार महिन्यांपासून रस्ता नादुरुस्तीचे कारण दाखवून एसटी महामंडळाने साहूर- दोंडाईचा बससेवा बंद केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज दहा किलोमीटर पाटपीट करावी लागते. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता शिंदखेडा तालुक्‍यात मानव विकास मिशनअंतर्गत बससेवा सुरू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला. ‘मायबाप सरकार आम्हा लहानग्यांना न्याय देणार कधी’ अशी आर्त हाक देत विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध नोंदविला. 

बससेवा बंद झाल्यामुळे परिसरातील साहूर, शेंदवाडे, झोटवाडे, दाउळ, मंदाणे या गावांतील अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेअंतर्गत येतो तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून दुरुस्तीची तत्काळ मंजुरी द्यावी. एससी, एसटी व ओबीसी मुलांची शालेय शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी. शिंदखेडा तालुक्‍यातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता मानव विकास मिशनच्या गाड्या सुरू कराव्यात, विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट स्वरूपाचा येत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून उच्च दर्जाचा पोषण आहार द्यावा, या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. राणाप्रताप चौक, झाशी राणी पुतळामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी श्री. सोनवणे यांच्यासमवेत संजय मगरे, रजेसिंग राजपूत, काजल कोळी, सोनाली कोळी, ज्ञानेश्‍वरी कोळी, जागृती कोळी, तनुप्रिया सोनवणे, भूमिका कोळी, नंदिनी कोळी, मंगला वाघ, संजना मगरे, प्रतिभा कोळी, अक्षता कोळी, ज्योत्स्ना कोळी, हिमाली मालचे, प्रियांका कोळी, ममता साळवे, आरती साळुंखे, विवेक देसले, नीलेश कोळी, दिनेश मालचे, हेमंत शिरसाट, दिनेश शिरसाट, कृष्णा बोरसे, नीलेश निकम, अजय शिरसाट, अंकुश शिरसाट, योगेश कुवर, अजय कोळी, प्रीतम सोनवणे, राज कोळी यांच्यासह अन्य विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: students walking ten kilometers per day