वाढीव शुल्कामुळे अभ्यासिकांचा सहारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

शुल्क लाखांपर्यंत
नाशिक शहरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारे शंभरहून अधिक क्‍लासेस कार्यरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेसाठी सरासरी चाळीस ते पन्नास हजार रुपये इतके शुल्क खासगी क्‍लासेसकडून आकारले जात आहे. तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठीचे शुल्क साधारणत: एक लाख रुपयांपर्यंत आकारले जाते. अध्ययनासोबत अभ्याससामग्री व मासिक, साप्ताहिक असे संदर्भसाहित्यदेखील उपलब्ध करून दिले जात असते. एमपीएससीसाठी पुण्याला तर यूपीएससीसाठी दिल्लीला असलेल्या अनेक शिकवण्यांतील शुल्क तर सामान्य कुटुंबातील परीक्षार्थींच्या आवाक्‍याबाहेर असतात.

नाशिक - प्रशासकीय सेवेत जाऊन चांगले करिअर करण्यासह देशसेवा करण्याच्या उद्देशाने अनेक होतकरू युवक स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असतात. काही स्वयंअध्यनातून तर काही क्‍लासेसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. युवा वर्गाचा वाढता ओढा लक्षात घेता, शिकवण्यांचे शुल्क अव्वाच्या सव्वा होत असल्याने अनेक युवक अभ्यासिका, ग्रंथालयांतून स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागले आहेत.

विविध पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षांच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारो पटींनी अधिक असते. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, शिकवणीचालकांकडून शुल्कात सातत्याने वाढ केली जात आहे. कशीबशी व्यवस्था करून अनेक युवक शुल्क अदा करता आहेत. तर काही स्वयंअध्यनावर भर देतांना अभ्यासिका, ग्रंथालयांत तासंतास अभ्यास करत स्पर्धा परीक्षांना सामोरे जात यश मिळवत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: study increased charges Education Competition Exam