Dhule Market Committee : धुळे बाजार समिती भाजपच्या ताब्यात द्यावी; नेतेमंडळींचा सूर

subhash bhamre statement about Bazar Committee should be handed over to  BJP
subhash bhamre statement about Bazar Committee should be handed over to BJP esakal

धुळे : धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात राहिली. त्या काळात भ्रष्टाचार वाढला. तो रोखण्यासह शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाजार समिती भाजपच्या ताब्यात द्यावी. (subhash bhamre statement about Bazar Committee should be handed over to BJP dhule news)

यानंतर तिचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, असे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले. त्यांच्या सुरात सूर मिसळत समितीत भाजपची सत्ता आणण्याचा निर्धार नेतेमंडळींनी केला.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात शनिवारी (ता. १) दुपारी राम पॅलेस येथे भाजपतर्फे शेतकरी, मतदारांचा मेळावा झाला. त्यावेळी खासदार डॉ. भामरे बोलत होते. लवकरच निवडणुकीचे पॅनल ठरणार आहे. भाजप उमेदवारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, प्रा. अरविंद जाधव, बापू खलाणे, देवेंद्र पाटील, संजय शर्मा, रावसाहेब गिरासे, संग्राम पाटील, विजय पाटील, राम भदाणे, नरेश चौधरी, आशुतोष पाटील, शंकर खलाणे, गजेंद्र अंपळकर, महादेव परदेशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

subhash bhamre statement about Bazar Committee should be handed over to  BJP
Vedokt Controversy : महंत सुधीरदास यांनी स्पष्टपणे माफी मागावी : करण गायकर

मेळाव्यात बाजार समितीची निवडणूक क्षमतेने लढण्याचा निर्धार भाजपने केला. यात समितीत सत्ता मिळवून पारदर्शकपणे कारभार केला जाईल, असा विश्‍वास मान्यवरांनी दिला. नेते श्री. देवरे यांनी त्यांच्या कार्यकाळात कुशलतेने बाजार समितीचे कामकाज केल्याचे स्पष्ट केले. त्यांनी साडेसात कोटींचे कर्ज असलेल्या बाजार समितीचे सर्व कर्ज फेडून बाजार समितीत मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.

श्री. कदमबांडे यांनी बाजार समितीत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अडीअडीचणीसंदर्भात मार्गदर्शन केले जाईल, अशी ग्वाही दिली. डॉ. भामरे म्हणाले, भाजपची नेतेमंडळी संघटित असून कुणीही अफवांना बळी पडू नये. राज्यातून किंवा केंद्रातून बाजार समितीसाठी सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल.

समितीचा कारभार प्रशासकांच्या हाती गेल्यानंतर अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला. देवेंद्र पाटील, भाऊसाहेब देसले, रावसाहेब पाटील, संग्राम पाटील यांची प्रशासकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सहा महिने विरोधकांचा घाम काढला. सत्ता दिल्यास शेतकऱ्यांना कुठलीही तक्रार करण्याची वेळ भविष्यात येणार नाही. तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रावसाहेब गिरासे यांनी आभार मानले.

subhash bhamre statement about Bazar Committee should be handed over to  BJP
Dhule News : सप्तशृंगगडाच्या यात्रेसाठी धुळे विभागातून सुटल्या २०० बसेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com