हरणाची शिकार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात यश

ambasan
ambasan

अंबासन (जि.नाशिक)- मळगाव भामेर (ता.बागलाण) येथील पोहाणे शिवारात रात्री एक ते दिडच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने चिंकारा नर या जातीच्या हरणाची शिकार केल्याची धक्कादायक घटना घडली. हे शिकारी तब्बल वर्षभरापासून येथील हरणांवर पाळत ठेऊन होते. अखेरीस ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने सापळा रचत तीन जणांना अटक केली. तर सात जण दुचाकी सोडून अंधाराचा फायदा घेत फरार झाले. 

सविस्तर माहिती अशी की, गेल्या वर्षभरापासून मळगाव ते पोहाणे या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर गुजरात राज्यातील काही मजूर कामावर असून, रस्त्यालगतच असलेल्या अवैधरित्या गावठी दारूच्या अड्ड्यावर नशा करीत असल्याचे कुजबुज ग्रामस्थांनी लागली होती. त्यांनी या मजूरांवर पाळत ठेवत. काही दिवसांपूर्वीच संशयितरित्या फिरणारी बोलेरेगाडी मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामस्थांनी रस्त्यावर आडवी केलेली बैलगाडीला धडक देऊन पळ काढला होता परंतू हाती लागली नाही. पाळत ठेवून असलेल्या नागरिकांनी नेहमीप्रमाणे रविवार (ता.११) रोजी रात्री एकच्या सुमारास जिभाऊ तुळशीराम आहिरे (वय ६०), राहणार अंबासन यांच्या दारूच्या अड्डयावर ग्रामस्थांना अनोळखी पाच दुचाकी आढळून आल्याने ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचा-यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तोपर्यंत ग्रामस्थांनी पाचही दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीत जमा केले. ग्रामस्थांनी व वनकर्मचा-यांनी जिभाऊ आहिरे यांच्या घरात झाडाझडती घेतली असता त्यांना तीन वर्षीय चिंकारा नर जातीच्या हरणाची शिकार केलेली आढळून आली. शिकारी पुन्हा दोन कुत्र्यांसह एका हरणाची शिकार करण्यासाठी डोंगरावर चढले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नागरिकांनी सिनेस्टाईलने पाठलाग करत तीन जण तावडीत सापडले. मात्र आरोपी हत्यारबंद असल्याने नागरिकांनी व वनविभागाच्या कर्मचा-यांनी जिवाची पर्वा न बाळगता आरोपींना पकडले मात्र अंधाराचा फायदा घेवून सात आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. तिन्ही आरोपीना नागरिकांनी चोप देत पाच दुचाकी, कोयता, हरण शिजविण्याचे साहित्यासह वनविभागाच्या स्वाधीन केले. परिसरात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून जंगलात मोरांचा व जंगली श्वापदांचा नेहमीच वावर असतो. त्यात दुष्काळाच्या वन्यप्राणींना झळा बसत असून वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ नागरी वस्तीकडे वावरू लागला आहे. याचाच फायदा घेऊन शिकारी आपला कार्यभार साधत असल्याचे समोर आले आहे. त्याच परिसरात वीस ते पंचवीस हरणाचा कळप नेहमीप्रमाणे वावर आहे मात्र दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होत असल्याचे बोलले जात आहे. 

यावेळी वनपाल कृष्णा बोरसे, वनरक्षक ए.डी.हेंमाडे, के.एम. आहिरे, वनमजूर राजू सोंळूखे, जिभाऊ आहिरे, दिलीप खेमनार, जगन आहिरे, निंबा देवरे, दिपक हिरे, सरपंच राजाराम मोगरे, पोलिस पाटिल नाना फटांगडे, प्रभाकर फटांगडे, संदिप कन्नोर आदि ग्रामस्थांनी शिकारी पकडण्यासाठी मदत केली.

अटक केलेले शिका-यांची नावे
१) जिभाऊ तुळशीराम आहिरे (वय६०) रा. अंबासन ता.बागलाण 
२) शैलेश सोन्या बागुल (वय२२) रा. करंजटी ता. अहवा जि.डांग (गुजरात)
३) तुळशीराम सखाराम पवार (वय ३०) रा. करंजटी ता.अहवा जि.डांग(गुजरात)

परवीश मंगा चौधरी, सुरेश मुरली वारळी, पिंट्या मगन वारळी, धर्मेश आडगू, शिवमन उमेश वारळी, ईश्वर गंगाराम गावित, अश्विन गंगाराम गावित सर्व राहणार कंरजटी ता. अहवा जि. डांग (गुजरात राज्य)

जप्त केलेली मोटारसायकल क्र.
१) जीजे.३० बी १७४४
२) जीजे १५ एके ४२३८
३) जीजे ३० बी ३००४
४) जीजे ३० सी २०१६
५) जीजे ३० बी ०२४२    

पोहाणे ते मळगाव रस्त्याचे तब्बल एक वर्षापासून संत गतीने सुरू आहे. याच कामावरील मजूर दिवसा टेहाळणी करीत होते. अनेक वेळा बोलेरो गाडी रात्रीची संशयास्पद फिरतांना दिसून आली. आम्ही ग्रामस्थांनी व वन कर्मचा-यांच्या मदतीने शिकारी मोठ्या शिताफीने पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले.
- प्रभाकर फटांगडे, मळगाव 

याबाबत सर्व आरोपींची कसून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात वनविभागाकडून पाऊल उचलले जाईल व चिंकारा जातीच्या हरणांच्या शिका-यांचे आंतरराष्ट्रीय राज्यात काही संबंध आहे का. यांची कसून तपासणी केली जाईल.
- निलेश काबंळे, वनपरिक्षेत्र आधिकारी ताहाराबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com