अपंग कल्याण केंद्रातील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

सटाणा : येथील नामदेवराव मोहळ विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठाण संचलित निवासी अपंग (दिव्यांग) कल्याण केंद्रातील विद्यार्थी खेळाडूंनी देवरी (जि.गोंदिया) येथे नुकत्याच पार पडलेल्या दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत ३ सुवर्णपदक, एक रौप्य तर एक कांस्यपदक प्राप्त करून उज्वल यश मिळविले.

या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत केंद्रातील प्रकाश बोरकर (५० मीटर धावणे), राजेंद्र निंबा अहिरे (१०० मीटर धावणे) व संतोष चौरे (लगोरी फोडणे) या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळविले. निलेश मुळे (१०० मीटर धावणे) या विद्यार्थ्यास रौप्यपदक तर ऋतुजा ठाकरे (१०० मीटर धावणे) या विद्यार्थिनीने कांस्यपदक मिळविले. सर्व यशस्वी खेळाडूंना केंद्राचे व्यवस्थापक बाळासाहेब गिरी, क्रीडाशिक्षक अशोक धोंडगे, अधीक्षिका सविता बावा, डॉ.मुकेश पाटील, अरुण सोनवणे, सुरेखा भामरे, केवील वळवी, राहुल सोनवणे, शरद पवार, नवनाथ दहादडे, कल्याणी बधान, अनिता पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे केंद्राचे अध्यक्ष डॉ.सतिश लुंकड, शामकांत मराठे, व्ही.एम.पाटील यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
 
Web Title: success of handicapped students in state level sports