सुचिताची दातृत्ववृत्ती कौतुकास्पद!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नामांकित कंपनीत सॉफ्ट्वेअर इंजिनिअर म्हणून नव्याने नोकरीला लागलेल्या कळवण येथील सुचिता सुरेश निकम हिने आपल्या पहिल्या पगारातील ११ हजार रुपये नांदुरी येथील सप्तशृंगी वृध्दाश्रमाला देणगी म्हणून दिली आहे. तिच्या दातृत्ववृत्तीमुळे संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

नाशिक : नामांकित कंपनीत सॉफ्ट्वेअर इंजिनिअर म्हणून नव्याने नोकरीला लागलेल्या कळवण येथील सुचिता सुरेश निकम हिने आपल्या पहिल्या पगारातील ११ हजार रुपये नांदुरी येथील सप्तशृंगी वृध्दाश्रमाला देणगी म्हणून दिली आहे. तिच्या दातृत्ववृत्तीमुळे संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो    

कळवण येथील ध्येयवेडे गंगा पगार यांनी नांदुरी शिवारात कळवण - नाशिक रस्त्यालगत समाजातील ५५ वर्षापेक्षा जास्त महिला वय  व ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषा अशा उपेक्षित माता पिता व अनाथांसाठी श्री सप्तशृंगी वृद्धाश्रम सुरु केले आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. म्हणून कळवण  येथील शेतकरी, ओम ज्युसचे संचालक, भाजपा कार्यकर्ते सुरेश निकम यांची कन्या सुचिता सुरेश निकम सॉफ्ट्वेअर इंजिनियर हिने पदवी मिळविली आहे. तिला नाशिक येथील चांगल्या नामांकित कंपनीत नोकरीही लागली आहे. तिने आपल्या पहिल्या कमाईतील पगारातील ११ हजार रुपये नांदुरी येथील श्री सप्तशृंगी वृध्दाश्रमाला भेट देऊन देणगी दिली आहे. तिच्यासोबत आई, वडील व भाऊ असा सर्व परिवार उपस्थित होता. यावेळी पगार परिवारातर्फे सुचिताचे आभार मानून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suchita gives money from fer first salary