VIDEO : "सर सलामत तो पगडी पचास" तीसहुन अधिक त-हेने फेटे बांधणाऱ्या अवलियाची कमाल

सागर आहेर : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

"सर सलामत तो पगडी पचास" अशी आपल्याकडे म्हण आहे. यातला गमतीचा भाग सोडला, तर आजच्या जमान्यात किती जणांना फेटे बांधता येतात?  नाही ना! पण निफाड तालुक्यातील भेंडाळी सारख्या गावातील सुदाम खालकर मात्र जवळपास ३० हुन अधिक त-हेने फेटे बांधणारा एक अवलिया आहे.

नाशिक : महाराष्ट्रात २५० हुन लोककला असून, २७ ते २८ प्रचलित बोलीभाषा आहेत. आपल्याकडे एक मैलावर भाषा बदलते, तसा वेशभूषेतही बदल होत असतो. प्रत्येकाची फेटे बांधण्याची पद्धतही वेगळी! कोल्हापुरी फेटा, सोलापुरी फेटा,ब्राह्मणी फेटा, धनगरी फेटा, शेतकरी फेटा, राजस्थानी फेटा यांसह इतरही असे कित्येक प्रकारचे फेटे बांधण्याचे प्रकार आहेत.आणि या सगळे प्रकार सुदाम खालकर सहज फेटा बांधतात. शिवाय डोळ्याला पट्टटी बांधून ही फेटा बांधण्याचे कौशल्य त्यांनी निर्माण केले आहे.

 

Image may contain: 2 people, people smiling, hat and closeup

सुदाम खालकर यांनी फेटा बांधण्याच्या कलेतून केली कुटुंबाची प्रगती

एखाद्या माणसाने फेटा घातला की, त्याच्यात रूबाबदारपणा आपोआपच येतो, हे फेटय़ाचे वैशिष्टय़ आहे. सूर्यापासून संरक्षण, अंथरून पांघरूनसाठी, उशी म्हणून, अडचणीत विहिरीचे पाणी काढण्यासाठी, जंगलातून चालले असताना जनावर आल्यानंतर झाडावर चढण्यासाठी फेटय़ाचा वापर केला जायचा. बाजीप्रभू देशपांडेंची ढाल पडली. त्यावेळी डोक्यावरील फेटा काढून त्यांनी ढाल म्हणून वापरला,’ यासेही सुदाम यांनी सांगितले

Image may contain: 1 person, standing

फेटा बांधण्याची कला आत्मसात

विशेष म्हणजे त्यांना फेटा बांधण्याची कला कोणीही शिकवल नाही. तुकाराम खेडकर यांच्या तमाशातील तत्कालीन मॅनेजर तात्या बेल्हेकर यांच्या मुलाचं लग्न होत.माझ्याकडे घोडा असल्या कारणाने मी नवरदेव मिरवण्यासाठी गेलो.त्यांचे फेटे बांधणी बघून मी प्रभावीत झालो. नंतर मला व बंधूंना फेटे बांधले. नंतर तेच फेटे माझ्या पुतण्यांच्या डोक्यावर बांधणं चालु केलं.नंतर आईला एखाद्या पाहुण्यांकडून लुगडं आले की मी पहिला फेटा बांधून बघे असच दोन तीन वर्षे चालत राहीलं.

Image may contain: 1 person, sitting, standing and hat

जीवनातील पहिली ऑर्डर ३०० रुपयांची..
एखादया नवरदेवाला फेटा बांधायला कोणी नसेल तर मी होतोच.असा प्रवास चालू असताना लोक व्यवसाय करतात मग आपणही करू अशी कल्पना मनात आली. 
ती सत्यात उतरवण्या साठी खूप मेहनत करावी लागली, त्यावेळी अक्षरशः लोक हसले.
 माझ्या जीवनातील पहिली ऑर्डर लासलगाव येथील रॉयल पॅलेस मधील ३०० रुपये... ते तीनशे खूप वाटले  परिस्थिती प्रतिकूल असल्याने कोठुरे,गुळवंच,निफाड येथे पायी जाऊन फेटे बांधले.

Image may contain: 1 person, smiling, hat and outdoor

शिवराज्याभिषेक दिना निमित्ताने शिवभक्तांना स्वखर्चाने फेटा

फेट्यांच्या व्यवसायातून सन २००६ मध्ये पहिल्यांदा सायकल घेतली,घर बांधले. त्या बरोबर द्राक्षबाग ही लावला. आतापर्यंत खासदार छत्रपती संभाजी महाराज भोसले यांना सात आठ वेळेस,उदयन महाराजांना दोनदा तर स्वर्गीय भैयु महाराज यांना तीन वेळेसफेटा बांधण्याचे भाग्य लाभले. रायगडावर सन २००९ पासून शिवराज्याभिषेक दिना निमित्ताने नाशिक जिल्ह्यातून येणाऱ्या शिवभक्तांना स्वखर्चाने फेटा बांधत असतात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudam Khalkar confine feta Nashik News