नाशिक - अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारंबळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

खामखेडा (नाशिक) : बागलाण तालुक्यातील अनेक गावासह आज देवळा तालुक्यातील खामखेडा, सावकी भउर, विठेवाडी गावात साडेचारच्या सुमारास आज जोरदार वादळ व अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने काढणी सुरु असलेल्या व शेतात असलेल्या कांदा व खामखेडा परिसरातील टोमॅटो, टरबूज, खरबूज, मिरची आदी पिकांचं नुकसान झाले आहे. तर वादळाने टोमाटो,मिरची जमीनदोस्त होत.आंबा तसेच फळ पिकांची मोठ्या प्रमाणावर गळ झाली आहे.  

आज गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने अर्धा झोडपलं.अचानक आलेल्‍या अवकाळी पावसामुळे खामखेडा परिसरात सूरु असलेल्या कांदा काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.कांदा काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ चालू असतांना काही शेतकऱ्यांचा  काढून ठेवलेले कांदा पीक शेतात असल्याने ते ताडपत्रीने झाकण्यासाठी  शेतकऱ्यांची तारांबळ व धावपळ उडालेली दिसली.अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसामुळे तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता  बळीराजाला सतावू लागली आहे.वादळी वारा व पावसामुळे परिसरातील कांदा, डाळींब, कांदा बियाणांचे, भाजीपाला पिक, आंबा यांचं मोठं नुकसान होणार आहे.

या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.भाजीपाला पिकावर करपा तशेच डावन्याने बाधित होण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत. अर्धा तास पाऊस झाला त्यात काढ़णीला आलेला कांदा अनेक ठिकाणी भिजून मोठं नुकसान होणार आहे. अशीच परिस्थिती डाळिम्ब आणि आंबा पिकांची झाली.आधीच सर्वच  पिकाना मातीमोल असणार्या बाजार भावाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला निसर्गाच्या या अवकाळी पावसाने आणखीनच संकटात टाकलं आहे.

Web Title: Sudden rain problem to farmers