ऊस व्यापाऱ्याकडून वरखेडे येथील शेतकऱ्यांची फसवणूक 

दीपक कच्छवा
शुक्रवार, 22 जून 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : शेतात रक्ताचे पाणी करून पोटाच्या गोळ्याप्रमाणे जतन केलेल्या उसाला भाव नसल्याने शेतकरी हाताश झाला आहे. त्यात बाहेरील जिल्ह्यातील ऊस व्यापारी जास्तीच्या भावाचे आमिष दाखवून शेतकर्यांची फसवणूक करीत असल्याच्या घटना घडत आहेत.असाच काहीसा प्रकार वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील शेतकर्याबाबतत घडला असुन, करजगाव (ता.निफाड) येथील भामट्याने शेतकर्याचा ऊस तोडुन पोबारा केला आहे.याबात  मेहुणबारे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वरखेडे येथील ऊस उत्पादक शेतकरी राजेंद्र  पाटील यांनी विजयसिंग राजपुत यांच्या शेतात निमबटाईने ऊस लागवड केली आहे. त्यांचा ऊस तोडण्यायोग्य झाल्यानंतर ते  विकण्याच्या तयारीत होते. आशातच निफाड तालुक्यातील  ऊस व्यापारी संतोष पावसे यांच्याशी त्यांची ओळख झाली. पावसेने राजेंद्र पाटील यांच्या शेतातील ऊस हा दोन हजार 800 रुपये प्रतिटन या भावाने घेण्याचे ठरविले.त्यानुसार पाटणा येथील पिकअप (क्रमांक
MH.19.BM.2379) या गाडीत  ऊस भरून वजन केले. शेतकरी राजेंद्र पाटील,यांनी गाडी थांबवल्यावर चालकाने लगेच दुसरी गाडी घेवुन येतो ऊस तोडुन ठेवा व तेव्हाच लगेच पैसे देतो असे सांगितले.मात्र त्यानंतर दुसरी गाडी आलीच नाही.चौकशीनंतर संतोष पावसे यांने ऊस विकून पैसे घेवुन पोबारा केल्याचे लक्षात आले.ऊसतोडणीला लावलेल्या  मजुराचे 16 मजुरांचे पैसे देखील या ठगाने दिले नाही. त्यामुळे शेतातून नेलेला तीन टन व तोडुन ठेवलेला तीन टन  असा सहा टनाची सुमारे 16 हजारांची फसवणूक पावसे यांने केली. याबाबत राजेंद्र पाटील यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे.पोलिसांनी आपल्याला फसविणार्याचा शोध घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आशी मागणी केली आहे.

ऊस व्यापाऱ्याने अनेकांना घातल्या टोप्या 
निफाड तालुक्यातील संतोष पावसे या महाभागने निफाड तालुक्यातही अनेक शेतकर्यांना टोप्या घातल्या असल्याची चर्चा आहे.मात्र या व्यापारीवर वेळीच पोलिसांनी कारवाई केली तर हा पुढे कोणत्याही शेतकर्याला फसवण्याचे धाडस करणार नाहीत.त्यामुळे या व्यापार्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आशी मागणी शेतकरी राजेंद्र पाटील यांनी केली आहे.

ऊसाच्या व्यापाऱ्याने अनेकांना घातला गंडा ?
निफाड तालुक्यातील संतोष पावसे या ऊसाच्या व्यापाऱ्याने अनेक शेतकऱ्यांना गंडा घातल्याची चर्चा आहे.त्याच्याविरोधात पोलिसांनी वेळीच कारवाई केली तर पुन्हा कोणत्याही शेतकऱ्यांची फसवणूक करणार नाही . त्यामुळे पोलिसांनी यासंदर्भात गांभीर्याने दखल घेऊन संतोष पावसेला तात्काळ अटक करावी, अशी मागणी शेतकरी राजेंद्र पाटील यांनी केली आहे.

Web Title: sugarcane businessman fraud to farmers