ॲपमधून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

सटाणा - येथील यश कॉम्प्युटर्स संगणक प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक योगेश अहिरे यांनी ‘सटाणा ए २ झेड’ या ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपमधील जाहिरातींच्या माध्यमातून संकलित होणारी रक्कम बागलाण तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत स्वरूपात दिली जाणार आहे. 

गेल्या वर्षी या ॲपची प्रथम १.० आवृत्ती सुरू केली होती. आय न्यूज वृत्तवाहिनीतर्फे झालेल्या दहाव्या ‘राज्यस्तरीय देवमामलेदार यशवंत गौरव पुरस्कार’ वितरणप्रसंगी अभिनेत्री वर्षा उसगावकर व ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्या हस्ते या ॲपच्या दुसऱ्या २.० आवृत्तीचे प्रकाशन झाले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने या ॲपची निर्मिती केल्याचे प्रा. अहिरे यांनी सांगितले. या ॲपमुळे शहर व परिसरातील लहान-मोठ्या व्यावसायिकांना ग्राहकांशी थेट संपर्क साधता येणार असून, मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप मोफत डाउनलोड करता येणार आहे. 

दरम्यान, १५ डिसेंबर २०१६ ला विंचूर (ता. बागलाण) येथील राजाराम गायकवाड या शेतकऱ्याने शेतीमालाचे कोसळणारे बाजारभाव व कर्जबाजारीपणाला कंटाळून विषप्राशन करीत आत्महत्या केली होती. गेल्या वर्षभरात या ॲपमधील जाहिरातीच्या माध्यमातून संकलित झालेल्या १०० टक्के निधीचा धनादेश अभिनेत्री वर्षा उसगावकर व श्री. माने यांच्या हस्ते दिवंगत शेतकरी राजाराम गायकवाड यांचे पुत्र मनोज यांनी स्वीकारला. आय न्यूजचे संस्थापक देवेंद्र वाघ, नितीन सोनवणे, डॉ. प्रवीण खैरनार, किशोरी अहिरे आदी उपस्थित होते.

Web Title: suicide affected farmer family help by app