द्राक्ष उत्पादकाची दिंडोरीत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

लखमापूर - कर्जाचा डोंगर, सततची नापिकी आणि शेतमालाच्या बाजारभावातील घसरण, यामुळे त्रस्त झालेल्या खेडगाव (ता. दिंडोरी) येथील माणिक अशोक रणदिवे या द्राक्ष उत्पादक तरुणाने शनिवारी पहाटे शेताजवळील झाडाला गळफास घेऊन आमहत्या केली. माणिक याच्या नावावर तीन ते साडेतीन एकर शेती असून, सर्व क्षेत्रावर द्राक्षबाग आहे.

सलग चार-पाच वर्षांपासून नुकसान होत असल्याने वडील अशोक रणदिवे यांच्यावर जवळपास दहा लाख रुपयांचे कर्ज झाले. नुकसानीमुळे हे कर्ज फेडणे त्याला शक्‍य होत नव्हते. कर्जाच्या ओझ्यामुळे तो अखेर एका द्राक्ष व्यापऱ्याकडे मजुरी करू लागला होता.

Web Title: suicide in dindori