'सुकन्या' योजनेत जळगावची "समृद्धी'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

जळगाव - मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी अल्पबचतीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने टपाल खात्यांतर्गत सुरू केलेल्या "सुकन्या समृद्धी' या विशेष गुंतवणूक योजनेत जिल्ह्याने बाजी मारली आहे. आठ तालुक्‍यात विशेष मोहीम राबवून तब्बल सहा हजार खाती उघडण्यात आल्याने औरंगाबाद विभागातील दहा जिल्ह्यांमधून जळगाव प्रथम क्रमांकावर आहे.

भारतीय डाक विभागाने सध्याच्या गतिमान व बदलत्या युगाबरोबर चालताना आणि सामाजिक बांधीलकी म्हणून नवीन योजना व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागे पडत असलेल्या टपाल कार्यालयाच्या सेवा सर्वसामान्य व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत आहे.

Web Title: Sukanya Samruddhi Scheme