Vidhan Sabha 2019 : १९६० ते २०१९ 'आजीं' चे नॉनस्टॉप मतदान...वाचा

प्रमोद दंडगव्हाळ : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

देशात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९६० साली विधान सभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते सोमवारी (दि.२१) झालेल्या १४ व्या विधानसभा निवडणुकीत, देवळाली विधानसभा मतदार संघातून (ता.गौळाणे) जि. नाशिक येथील सखुबाई नामदेव चुंभळे या आजींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १९६० पासून आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या १४ निवडणुका झाल्या. पहिल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे त्यांनी सांगितले.  यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असल्याचे ते सांगतात.

नाशिक : १९६० पासुन ते आजपर्यंतच्या २०१९ प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सखुबाई नामदेव चुंभळे ( वय १००) यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी आजपर्यंतच्या सर्व १४ विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. 

 सखुबाई नामदेव चुंभळे (१०० वय वर्षे) यांचा अनोखा विक्रम

देशात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९६० साली विधान सभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते सोमवारी (दि.२१) झालेल्या १४ व्या विधानसभा निवडणुकीत, देवळाली विधानसभा मतदार संघातून (ता.गौळाणे) जि. नाशिक येथील सखुबाई नामदेव चुंभळे या आजींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १९६० पासून आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या १४ निवडणुका झाल्या. पहिल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे त्यांनी सांगितले.  यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असल्याचे ते सांगतात.

१९६० ते २०१९ या कालावधीत न चुकता मतदान

मतदान करणे ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट असते. आपला तो हक्क आहे. हा हक्क बजावणे हे लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी आवश्यक असते. त्यामुळे न चुकता प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क बजावला. १४व्या विधान सभेसाठी सोमवारी सकाळीच नातु विश्वास चुंभळे यांच्यासोबत गौळाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान  केंद्रावर दाखल होत हक्क बजावला असल्याचे त्यांनी सांगितले. मतदानाने लोकशाही बळकट होते. भारतीय लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आपली लोकशाही मजबूत आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारी असल्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. मतदानाशिवाय लोकशाहीला बळकटी येणे शक्य नाही. यामुळे १९६० ते २०१९ या कालावधीत झालेल्या प्रत्येक निवडणुकीवेळी न चुकता मतदान केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sukhbai Namdev Chumbhale voted for the nonstop 100 years