नाशिकला सुखोई-30 लढाऊ विमान कोसळले

सुभाष पुरकर
बुधवार, 27 जून 2018

भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 हे लढाऊ विमान आज सकाळी साडेदहाला शिरावे वणी (निफाड) येथे कोसळले. 

नाशिक - भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 हे लढाऊ विमान आज सकाळी साडेदहाला शिरावे वणी (निफाड) येथे कोसळले. 

वैमानिकाने इमर्जन्सी पायलट स्वीचद्वारे सुरक्षित लँडींग केले. ओझर येथील `एचएएल'च्या हवाई तळावरून नियमित सरावासाठी विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड जाणवल्याने वैमानिकाने नियंत्रण कक्षाला याविषयी संदेश दिल्याचे कळते. याविषयी कोणतीही अधिकृत माहिती `एचएएल'कडून मिळालेली नाही.

sukhoi30

दोन्ही पायलट पॅराशुटने खाली उतरतांना द्राक्षबागेच्या तारामुळे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने नाशिकला उपचारासाठी दाखल त्यांना दाखल करण्यात आले आहे. शासकीय यंत्रणेचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. शिरवाडे वणी येथून जवळ असलेल्या वावी ठुशी ता. निफाड गावाच्या शिवारात हे लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले. यात शाम निफाडे हा शेतकरी किरकोळ जखमी झाला आहे.

हे विमान शेतात कोसळल्याने सुदैवाने मोठी हानी झाली नाही. जर हे विमान मानवी वस्तीत किंवा घरावर कोसळलं असते, तर मोठं नुकसान झाले असते.विमान कोसळल्याचं समजताच परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Sukhoi fighter plane crashed at nashik