सुमनताई निकम पंचायत समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

नांदगाव - पंचायत समितीच्या सभापती सुमनताई निकम यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्याकडे सुपूर्द केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत समितीवर शिवसेनेची पंधरा वर्षांनंतर निर्विवाद सत्ता मिळविली होती.  

सर्वसाधारण गटातून सावरगाव गणातून विद्यादेवी पाटील व सुमनताई निकम ओबीसी महिला गटातून विजयी झाल्यानंतर सभापती पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र आवर्तन पद्धतीनुसार पहिली संधी निकम यांना मिळाली सव्वा वर्षाचा त्यासाठी आवर्तनाचा कालावधी ठरला होता. त्यामुळे निकम यांच्या नंतर पाटील यांना सभापती पदासाठी संधी मिळणार आहे. 

पंधरा वर्षांपूर्वी राजेंद्र आहेर यांच्या निमित्ताने शिवसेनेला सभापती पद मिळाले होते. त्यानंतर दया पाटील यांच्या संभाव्य निवडीमुळे पुन्हा एकदा शिवसेनेला दुसऱ्यांदा हे पद मिळणार आहे.  

पसभापती सुभाष कुटे यांचाही आवर्तन पद्धतीने राजीनामा घेतला जाणार असून, नव्या सभापतींची निवड झाल्यावर नव्या उपसभापतीची निवड होईपर्यंत कुटे यांच्याकडे सभापती पदाचा तात्पुरता पदभार सोपविला जाणार आहे. 

आपल्याला सर्व अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले होते. त्यामुळे त्या माध्यमातून आपणास ग्राम विकासाचे चांगले काम करता आल्याची भावना आहे. 
- मावळत्या सभापती सुमनताई निकम 

Web Title: Sumantai Nikam Panchayat Committee Chairman resigns