उन्हाळ कांदा खातोय भाव 

प्रशांत बैरागी
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

नामपूर (ता. नाशिक) - नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उन्हाळ कांद्याची सुमारे नऊ हजार क्विंटल आवक झाली. भविष्यात कांदा वधारण्याच्या शक्‍यतेने कांद्याची आवक घटली आहे. उन्हाळ कांद्याची आवक घटली असली, तरी बाजारात दाखल झालेला लाल कांदाही भाव खात आहे. उन्हाळ कांद्याला दोन हजार 400 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब भामरे यांनी दिली. 

मोसम खोऱ्यात यंदा कांद्याची विक्रमी लागवड असली, तरी शेतकऱ्यांकडील साठविलेला सुमारे 70 टक्‍क्‍यांहून अधिक कांदा संपुष्टात आल्याने येथील बाजार समितीच्या आवारात कांद्याची दैनंदिन आवक घटली आहे. कांद्याने पहिल्यांदा दोन हजारांचा टप्पा पार केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. लाल कांद्याला एक हजार 650 असा सर्वोच्च भाव मिळाला. कांद्याला कमीत कमी 700 रुपये, तर सरासरी एक हजार 900 रुपये असा भाव होता. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शेतमालाच्या आवकेमुळे बाजार समितीचे आवार फुलून गेले होते. 

देशांतर्गत बाजारपेठेत कांदा संपत आल्याने कांद्याचे दर वधारले आहेत. डिसेंबरपर्यंत लाल कांदा बाजारपेठेत येईल, तोपर्यंत दर टिकून राहतील. दिवाळीनंतर भावात वाढ होण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माल विक्रीस आणावा. 
-संजय येवला, कांदा निर्यातदार, नामपूर 

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी व पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त झाल्याने कांदा वधारला आहे. कांदा हवामानावर आधारित पीक असल्याने दुष्काळी परिस्थितीमुळे भविष्यात अजून कांद्याच्या दरात सुधारणा होईल. मलेशिया, चीन, थायलंडसह आखाती देशांत 70 टक्के निर्यात देशातून होत आहे. जागतिक बाजारात रुपया घसरल्याने निर्यात उत्पन्नात वाढ झाली आहे. 
-दीपक चव्हाण, शेतमाल बाजारभाव अभ्यासक 

Web Title: Summer Onion high price