जळगावकर रोज रिचवताहेत दोन हजार लिटर ताक!

जळगाव - तप्त उन्हात ज्यूसचा आस्वाद घेताना नागरिक. शेजारच्या छायाचित्रात मठ्ठ्याचा आस्वाद घेताना नागरिक.
जळगाव - तप्त उन्हात ज्यूसचा आस्वाद घेताना नागरिक. शेजारच्या छायाचित्रात मठ्ठ्याचा आस्वाद घेताना नागरिक.

जळगाव - गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानाने पंचेचाळिशीपार केली आहे. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांपासून शरीराला गारवा मिळावा यासाठी शीतपेयांना अधिक पसंती दिली जात आहे. शहरात दिवसाला दोन हजारांपेक्षा अधिक मसाला ताकाची, तर ५० लिटरच्या एक हजार जारची रोज मागणी होत आहे.

उन्हाचा पारा वाढत असताना थंडपेयांना मागणी वाढत आहे. महिन्याच्या तुलनेत उन्हाळ्यात दही, मसाला ताकाला अधिक मागणी असते. इतर महिन्यांत ताकाची विक्री ४०० लिटर इतकी होते; परंतु आता ही विक्री १२०० लिटरपेक्षा अधिक होत आहे. त्याप्रमाणे दही दिवसाला ५० ते ६० किलो विक्री होत असे. मात्र, आता त्याची विक्री १०० किलोपेक्षा अधिक होत असून, मसाला ताक पूर्वी दिवसाला २० लिटरपेक्षा अधिक होत नव्हती; परंतु उन्हाळ्यात मसाला ताकाला अधिक मागणी असल्याने त्याची विक्री दोन हजार लिटरपेक्षा अधिक होत आहे.

उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे, तसेच कोकम सरबत, आवळ्याचे सरबत, मोसंबी रस, कलिंगड रस आणि ताक प्यावे. त्वचेसाठी अंघोळ झाल्यावर कोरफड जेल लावावे. डोक्‍याला स्कार्फ बांधूनच बाहेर पडावे. भरपूर फळे खाण्याबरोबर आहारात दही-भाताचा समावेश करावा. भरपूर पाणी प्यावे.
- डॉ. चेतन खैरनार

सध्या जळगावचे तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. ग्राहकांकडून मसाला ताकासह दह्याला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. शहरात दिवसाला दोन हजारांपेक्षा अधिक मसाला ताक, तसेच दही १०० किलोपेक्षा अधिक विक्री होत आहे. उन्हाळ्यात ताक व दही घेतल्यास शरीराला थंडावा मिळतो.
- आनंद सारस्वत,  संचालक, सरस्वती डेअरी

मिनिरल वॉटरसह बिसलिरी बॉटल्सना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ग्राहकांकडून इतर महिन्यांपेक्षा उन्हाळ्यात अधिक मागणी होत असल्याने यंदा ५० ते ६० टक्के मागणी वाढली आहे. नाशिकसह गाडेगाव एमआयडीसीतून या बॉटल्सचा पुरवठा होत असल्याने मागणीनुसार साठवणूक करावी लागते.
- अक्षय बाहेती,  संचालक, दिव्य एजन्सी

वाढत्या उन्हामुळे पाण्याच्या जारला मागणी वाढली आहे. इतर महिन्यांत रोज १०० पेक्षा अधिक जारची विक्री होत असते. मात्र, आता वाढत्या उन्हामुळे जारची मागणी ३० ते ४० टक्के वाढली आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी हे जार ३० ते ५० रुपयांपर्यंत विक्री केले जाते.
- उमेश कोळी,  उमेश ॲक्‍वा जार विक्रेता

उन्ह्याच्या झळांपासून शरीराला गारवा मिळावा यासाठी मठ्ठा व पायनापल, मॅंगो यांसारख्या फळांच्या ज्यूसला अधिक पसंती असते. रोज ४० ते ५० लिटर मठ्ठा व ३० ते ३५ लिटर ज्यूसची विक्री होते; परंतु उन्हाळ्यात ही विक्री वाढून दिवसाला मठ्ठा ७० लिटरपेक्षा अधिक, तर ज्यूसचीही ५० ते ६० लिटरपेक्षा अधिक विक्री होते.
- राजेंद्र चव्हाण, मठ्ठा विक्रेता

लहानांपासून आबालवृद्धांकडून आइस्क्रीमला पसंती दिली जाते. दिवसाला विविध प्रकारचे सुमारे ५०० लिटरपेक्षा अधिक आइस्क्रीमची विक्री होते. मात्र, आता ही विक्री ८०० लिटरपेक्षा अधिक होत आहे. दिवसेंदिवस ग्राहकांकडून मागणी वाढतच आहे.
- केशरलाल प्रजापत, आइस्क्रिम विक्रेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com