पाल ४८ रावेर ४९ अंशांचा पारा 

live photo
live photo

रावेर - राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाल (ता. रावेर) येथे आज दुसऱ्या दिवशीही ४८ अंशांचा पारा कायम होता. तर रावेर शहरात गेल्या गेल्या चार दिवसापासून ४९ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. या रखरखीत उन्हामुळे तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. केळी बांगानाही सार्वधिक फटका बसत आहे. तीव्र तापमानाने केळीची झाडे मोडून पडत असल्याने बागाच्या बागा जमीनदोस्त झाल्याचे दिसून येत आहे. 

सूर्याने आज पुन्हा आग ओकल्याने तालुक्यात आज दुपारी ३ ते ४ या काळात तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या पाल येथे ४८ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आल्याची माहिती येथील कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक अशोक देशेट्टी यांनी दिली. दरम्यान तापमान मोजणाऱ्या विविध ॲप्समध्ये येथील आजचे तापमान पुन्हा ४९ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. तालुक्यातील चिनावल येथेही तापमानाचा पारा ४९ अंशांवर गेल्याने केळीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. घडासह केळीची झाडे मोडून पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. केळी विमा कंपनीने तातडीने याची नोंद घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी केली आहे. 
 
भुसावळ विभागात उन्हाचा फटका 
भुसावळ विभागातील रावेर, यावल, भुसावळ जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड तापमानाने होरपडतोय. आज भुसावळला तर कोळशाच्या डब्बाला आग लागली तर रेल्वेच्या जनरेटरला आग लागल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. यावल व रावेर तालुक्यातही केळीच्या बागांना मोठा फटका बसत आहे. केळीच्या झाडे तीव्र उन्हाने कोलमडून पडत आहेत. रखरखीत उन्हात घराबाहेर पडता येत नसल्याने शेती कामे ठप्प पडत आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत रस्ते निमुर्नष्य दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com