गिरणा परिसरात उष्णतेची लाट 

दीपक कच्छवा
रविवार, 6 मे 2018

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) - तालुक्यासह ग्रामीण भागात वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे.त्याचा विपरीत परिणाम सर्वत्र जाणवू लागला आहे.तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड होत आहे.पशुपक्ष्यांसाठी हे ऊन घातक ठरत आहे.या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 
 

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) - तालुक्यासह ग्रामीण भागात वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे.त्याचा विपरीत परिणाम सर्वत्र जाणवू लागला आहे.तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड होत आहे.पशुपक्ष्यांसाठी हे ऊन घातक ठरत आहे.या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 
 
यावर्षी तापमानात खुपच वाढ झाली आहे. आशा परिस्थितीत उष्मघातासारखे प्रकार घडल्यास तातडीने उपचार मिळावे यासाठी तालुक्यात बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघातकक्ष स्थापन करण्यात आले आहेत.चाळीसगाव तालुक्यात दहा प्राथमिक आरोग्य केंद्र दोन आयुर्वेदिक दवाखाने व दोन ग्रामीण रुग्णालये आहेत.या सर्व ठीकाणी उष्माघातकक्ष स्थापन करण्यात आले आहेत.त्याचा आढावा नुकताच घेण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ देवराम लांडे यांनी सांगितले.दरम्यान उन्हाची तीव्रता बघुन नागरिकांनी स्वताची काळजी घेणे महत्वाचे ठरणार आहे.

उन्हाळ्यात हे करू नये
* लहान मुलांना कीवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या या पार्क केलेल्या वाहनात ठेवु नये.
* दुपारी बारा ते चारच्या कालावधीत उन्हात बाहेर जाण्याचे टाळावे.
* अगांत गडद व जाड कपडे घालणे टाळावे.
* बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाचे काम टाळावे.
*उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे.
*मोकळ्या हावेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या बंद ठेवु नये.

उन्हाळ्यात हे करावे
* तहान लागली नसली तरी जास्त पाणी प्यावे, अगांत हलके पातळ व सुती कपडे घालावे.
* प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
* बाहेर उघड्यावर विक्री होणारे शीतपेय पिऊ नये.
* उन्हात काम करतांना डोक्यावर टोपी घालावी,सुती रुमाल बांधावा कीवा छत्रीचा उपयोग करावा.
* थकवा वाटत असल्यास ओआरएसचे पावडर पाणी,घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबु सरबत कीवा ताक आदीचा जास्त प्रमाणात उपयोग करावा.
* गुरांना छावणीत ठेवून पाणी पाजावे,कामाच्या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करावी.
* शक्यतोवर सकाळीच काम करण्याचे नियोजन करावे व काम करतांना मध्ये मध्ये सावलीत येवुन थांबवावे.
* मजुरांनी थेट सुर्यप्रकाशाशी संपर्क टाळावा,जागोजागी पाण्याची सुविधा करावी.
* गरोदर महिलांनी अधिकच काळजी घ्यावी.
* आरोग्य बाबत काही तक्रार जाणवू लागल्यास तातडीने जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

अशक्तपणा, स्थूलपणा,डोकेदुखी, थकवा येणे, त्वचा कोरडी पडणे,चक्कर येणे, घाम येणे आदी लक्षणे ऊन लागल्याची असतात.अशी लक्षणे असल्यास घाबरू न जाता ही लक्षणे तात्काळ ओळखावीत व चक्कर येत असल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे.शहरासह ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात उष्माघातकक्ष स्थापन करण्यात आले आहेत.त्या ठीकाणी तात्काळ उपचार घ्यावे.
- डाॅ देवराम लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी चाळीसगाव

Web Title: summer temperature increase environment