उन्हाळी सुट्टीमुळे सप्तश्रृंगी गडावर भाविकांची गर्दी

दिगंबर पाटोळे
सोमवार, 14 मे 2018

गेल्या आठवडाभर सर्वत्र लग्नांची धुम सुरु आजपासून कमी झाली असून नवविवाहीत हे देव दर्शनासाठी सप्तश्रृंगी गडास प्राधान्य देत असल्यामूळे गडावर नवविवाहीत जोडपे तसेच नवरदेव नवरीचे कलवऱ्यांचीही मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यात नवसपूर्तीसाठी तिखट, गोड जेवनावळीही गडावर होत असल्याने अशा कार्यक्रमानांही सगेसोयरी इष्टमंडळी आवर्जुन हजेरी लावत असल्यामूळे गडावर अशा कार्यक्रमांमुळे गडास यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

वणी (नाशिक) : उन्हाळी सुट्ट्यांमुळे साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तीपीठ असलेले सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. 

परीक्षांचा हंगाम संपूण आता जवळपास सर्व शाळा महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी लागली आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेकांनी देवदर्शन व पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे नियोजन केले आहे. त्यातच लग्नाचा धुम धडका बऱ्यापैकी थंडावल्याने सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळां बरोबरच पर्यटन स्थळावर भाविक व पर्यटकांची गर्दी फुलु लागली आहे. दुपारी उन्हाचा चटका बसत असल्याने भाविक सकाळी १२ वाजेच्या आत व दुपारी साडेतीन चार वाजेनंतर प्रवास व पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी देणे पसंत करीत आहे. सप्तश्रृंगी गडावरही भाविकांची गर्दी उन्हाळी सुट्टी लागताच फुलु लागली असून सप्तश्रृंगी गडाला उन्हाळी यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

त्यात शनिवार व रविवार दोन दिवस चाकरमान्यांना सुट्टी असल्यामुळे दोन्ही दिवस सकाळी सातवाजेपासूनच भगवतीच्या दर्शनासाठी मंदीर सभामंडपात रांगा लागल्या होत्या. दुपारी दीड वाजे पर्यंत दर्शनासाठी रांगा कायम होत्या. उन कमी होताच तीन वाजेनंतर पुन्हा भाविकांची दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पहिल्या पायरी पासून न्यासाने पायऱ्यांवर डोम उभारलेले असल्यामुळे तसेच व्यवसायीकांनीही दुकानांसमोर उनपासून बचाव प्लस्टीक ताटपत्रींचे आच्छादन केल्यामुळे भाविकांची उन्हाच्या काहीलीपासून बचाव होत अाहे. गडावर गेल्या दोन महिन्यांपासून टँकरने पाणी पूरवठा केला जात असला तरी भाविकांना ट्रस्ट व ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था केली असल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

तर भाविकांच्या गर्दीमुळे प्रसाद, हार, पुजेचे साहित्य, हॉटेल व्यवसायीकांबरोबर खाजगी वाहतूक व्यवसायींकामध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान गर्दीच्या तुलनेने राज्य परीवहन महामंडळाने अतिरीक्त बसेसची व्यवस्था न केल्यामुळे भाविकांना नाईलाजास्तव वेळप्रसंगी जादा भाडे देवून प्रवास करावा लागत असल्यामुळे भाविकांनी सप्तश्रृंगी गड तसेच सापुतारा साठी जादा सोडण्याची मागणी केली आहे.

गेल्या आठवडाभर सर्वत्र लग्नांची धुम सुरु आजपासून कमी झाली असून नवविवाहीत हे देव दर्शनासाठी सप्तश्रृंगी गडास प्राधान्य देत असल्यामूळे गडावर नवविवाहीत जोडपे तसेच नवरदेव नवरीचे कलवऱ्यांचीही मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यात नवसपूर्तीसाठी तिखट, गोड जेवनावळीही गडावर होत असल्याने अशा कार्यक्रमानांही सगेसोयरी इष्टमंडळी आवर्जुन हजेरी लावत असल्यामूळे गडावर अशा कार्यक्रमांमुळे गडास यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

Web Title: summer vacation in Saptashrungi gad