पंचवीस कोटी निधीचे श्रेय आमदार भोळेंनी घेऊ नये - सुनील महाजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

जळगाव - शहराच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या पंचवीस कोटी रुपये निधीचे श्रेय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे आहे. आमदार सुरेश भोळे यांनी उगाच फुकटचे श्रेय घेऊ नये, असे मत खानदेश विकास आघाडीचे नगरसेवक व माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी व्यक्त केले. 

महापालिकेच्या सतरा मजली इमारतीतील महापौरांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. महाजन म्हणाले, की  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आले असताना भाजपचे नगरसेवक, तत्कालीन महापौर व ‘खाविआ’च्या नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन जळगावच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी पंचवीस कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली. 

मात्र, त्यानंतर या निधीसाठी महापौर नितीन लढ्ढा यांनी जलसंपदामंत्री महाजन यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यामुळे हा निधी आज प्राप्त झाला. मात्र, आमदार भोळे त्याचे श्रेय घेत आहेत. त्यांनी या निधीसाठी किती वेळा मुख्यमंत्र्यांकडे पत्र्यव्यवहार केला, हे जाहीर करावे. याशिवाय या निधीसाठी जी समिती स्थापन करण्यात आली, ती भोळेंच्या मागणीनुसारच करण्यात आली आहे. त्यातही सत्ताधारी गटाचे तर नाहीच; परंतु महापालिकेतील भाजप नगरसेवकांचे प्रतिनिधीही त्यांनी घेतले नाहीत. जळगावचा विकास खऱ्या अर्थाने जलसंपदामंत्री महाजन यांच्या माध्यमातूनच होऊ शकतो.

Web Title: sunil mahajan talking