नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने बळीराजाला दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नाशिक - अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पूर्व भागातही गुरुवारी (ता. 16) सकाळपासून समाधानकारक पाऊस सुरू झाल्याने या भागातील बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काही दिवसांपासून त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी तालुक्‍यांत सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे गंगापूरसह इगतपुरी तालुक्‍यातील अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांत समाधानकारक साठा निर्माण झाला. परंतु पूर्व भागातील मालेगाव, चांदवड, येवला, निफाड व नांदगाव भागांत पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा चिंतेत होता. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही उभे होते. गुरुवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने या भागातील बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या.

नाशिक - अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पूर्व भागातही गुरुवारी (ता. 16) सकाळपासून समाधानकारक पाऊस सुरू झाल्याने या भागातील बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काही दिवसांपासून त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी तालुक्‍यांत सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे गंगापूरसह इगतपुरी तालुक्‍यातील अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांत समाधानकारक साठा निर्माण झाला. परंतु पूर्व भागातील मालेगाव, चांदवड, येवला, निफाड व नांदगाव भागांत पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा चिंतेत होता. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही उभे होते. गुरुवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने या भागातील बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या. असाच पाऊस सुरू राहिल्यास या भागात ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या टॅंकरच्या फेऱ्याही कमी होण्याची चिन्हे आहेत. 

अनु. तालुका पाऊस (मिमी) 
1) नाशिक 4.3 
2) इगतपुरी 25.0 
3) त्र्यंबकेश्‍वर 14.0 
4) दिंडोरी 1.0 
5) पेठ 8.0 
6) निफाड 7.0 
7) सिन्नर 18.4 
8) चांदवड 4.0 
9) देवळा 6.0 
10) येवला 14.0 
11) नांदगाव 50.0 
12) मालेगाव 14.0 
13) बागलाण 2.0 
14) कळवण 7.0 
15) सुरगाणा 13.0 

Web Title: support of the farmers rains in the eastern part of the district of Nashik