उघड्यावर पडसेलेल्या सुराशे परिवारासाठी सायगावकर ठरले आधारवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

येवला : सायगाव येथील विलास सुराशे यांचे अपघाती निधन झाल्यावर भूमीहिन व बेघर असलेल्या सुराशे परिवारावर या अपघाताने मोठा आघात झाला आहे. मात्र उघड्यावर आलेल्या या परिवाराला गावातील सामाजिक दृष्टीच्या तरुणांनी आधारवड ठरत मदतीचा हात देऊन आयुष्याच्या वळणावर उभे राहण्यासाठी हात दिला आहे.   

येवला : सायगाव येथील विलास सुराशे यांचे अपघाती निधन झाल्यावर भूमीहिन व बेघर असलेल्या सुराशे परिवारावर या अपघाताने मोठा आघात झाला आहे. मात्र उघड्यावर आलेल्या या परिवाराला गावातील सामाजिक दृष्टीच्या तरुणांनी आधारवड ठरत मदतीचा हात देऊन आयुष्याच्या वळणावर उभे राहण्यासाठी हात दिला आहे.   

गावातील कोणत्याही कुटुंबावर संकट आले की, येथील श्री मुंजोबा मित्र मंडळाने सदैव मदतीचा हात पुढे केला आहे. सायगाव येथील विलास सुराशे (वय -40) यांचे नूकतेच अपघाती निधन झाले होते. कै.सुराशे यांना अभिजित, वैष्णवी, वैभवी अशी तिळी मुले असुन तिघांनीही दहावीची परिक्षा या वर्षी दिली आहे. गावात साजऱ्या होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह व गणपती वर्धापन दिनाच्या कार्यकमाच्या वर्गणीतून श्री मुजोबा मित्र मंडळाच्या सहभागाने अकरा रुपयांची मदत सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख यांच्या हस्ते कुटुंबाला देण्यात आली.

येथील जेष्ठ समाजसेवक बशीरभाई शेख, येवला खरेदी विक्री संघ अध्यक्ष भागुनाथ उशीर, सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख, सरपंच सुनिल देशमुख व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने हि मदत देण्यात आली. याप्रसंगी रमेश कोथमिरे, भास्कर गायकवाड, दिनेश खैरणार, राजेंद्र जठार, संतोष उशीर, गोरख लोहकरे, योगेश कूळधर, शरद लोहकरे,धर्मा सोनवणे, अरविंद उशीर, प्रमोद लोहकरे, पवन आहेर, अमित लोहकरे, नितिन कुळधर, नवनाथ उशीर, सचिन उशीर, गणेश उशीर आदी उपस्थित होते.

कुळधर यांचा मोठेपणा..
सायगावचे भूमिपूत्र कृषी आधिकारी अशोक कुळधर हे सेवानिवृत्त झाले आहे.मुजोबा परिवाराच्या विनंतीने सेवानिवृत्तीचा कुठलाही बडेजावाचा कार्यक्रम न करता कुळधर यांनी ११ हजार रुपयाची मदत बशीरभाई शेख यांचे हस्ते सुराशे कुटुंबाला करुन नविन आदर्श निर्मान केला आहे.या प्रसंगी अशोक कुळधर,वसंतराव खैरणार, रघुनाथ खैरणार, सुदाम भालेराव, विजय खैरणार, सी.बी. कुळधर, गणपत खैरणार, अमोल कुळधर आदी उपस्थित होते.तसेच यावेळी सरस्वती विद्यालयाने सुराशे यांच्या तिनही मुलांची दहावीची शैक्षणिक फी व खर्चाची जबाबदारी स्विकारल्याची माहिती मुख्याध्यापक सी.बी. कुळधर यांनी दिली आहे.ग्रामीण भागात गावगुंडीवरुन एकमेकांचे हवेदावे काढणाऱ्या धन्य मानणाऱ्या समाजासमोर सामाजिक संवेदना जागृत असल्यास सर्व काहि करणे शक्य आहे असेच मंडळाने सिद्ध केले आहे.

“अडचण करणाऱ्यांना मदत करणे हा आपला धर्म आहे.गावातील कोणत्याही कुटूंबावर आघात म्हणजे गावाचे संकट या भावनेतून शक्य त्या मदतीसाठी सदैव प्रयत्नशील आहोत.गावकऱ्यांचे योगदान देखील नेहमीच असते.”
- भागुनाथ उशीर, अध्यक्ष, खरेदी विक्री संघ,येवला

Web Title: surashe family gets support from saygao citizens