esakal | सुरगाणा पोलिसांनी उघडकीस आणले बनावट नोटांचे रॅकेट
sakal

बोलून बातमी शोधा

नोटांचे रॅकेट

सुरगाणा पोलिसांनी उघडकीस आणले बनावट नोटांचे रॅकेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदूरबार (सुरगाणा) : एक महिन्यांपूर्वीच उंबरठाण परिसरात गुजरात राज्यातील वापी, धरमपुर या भागातील बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणीत मांधा,बोरचोंड,गुही या भागातील संशयीत आरोपींच्या गुजरात पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. सदर घटनेस दीड महिना पण झाला नाही. तोच दुसरे रॅकेट उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

उंबरठाण येथे सहा सप्टेंबर रोजी एका भाजी विक्रेता महिलेला शंभर रुपयाची बनावट नोट दिली असता ती भाजी विक्रेत्यांनी ओळखले असता नागरिकांनी बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणा-यास चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते. यामध्ये हरिश वाल्मिक गुजर वय. २९ रा. विंचूर रोड येवला,बाबासाहेब भास्कर सैद वय.३८ रा. चिंचोडी खुर्द येवला,

अक्षय उदयसिंग रजपूत वय.३२ रा. येवला, यांना पोलिसांनी ताब्यात घेत तपासणी केली असता यामागे खुप मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे आढळून आले. या तिघाची ११ सप्टेंबर रोजी पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. पैकी अक्षय राजपुतची कसून चौकशी केली असता त्याने अन्य चार साथीदारांची नावे सांगत सदर नोटा कुठे व कशा तयार होतात याचा मुख्य सुत्रधार कोण याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा: नाशिक : ११ वीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतही कट-ऑफ ९० टक्क्‍यांवर

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयीत आरोपी प्रकाश रमेश पिंपळे वय ३१ रा. येवला, राहुल चिंतामण बडोदे वय. २७ रा. चांदवड, आनंदा दौलत कुंभार्डे वय.३५ रा. चांदवड, किरण बाळकृष्ण गिरमे वय. ४५ रा. विंचूर येथील रहिवासी असून ५०० व १०० रुपये किंमतीच्या ६ लाख,१८ हजार,२०० रुपये किंमतीच्या बनावट नोटा तसेच ३ लाख,६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल असा एकूण ९ लाख, ७८ हजार,२०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बनावट नोटा सह इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश असून संगणक, प्रिंटर, स्कॅनर, मोबाईल फोन, झेरॉक्स मशीन तसेच चारचाकी वाहन असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: गोदेची पातळी वाढली! गंगापूर, दारणा धरण समूहातून विसर्ग

या चौघांपैकी आज रोजी ता. १३/९/२०२१ प्रकाश पिंपळे व राहुल बडोदे यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे तर आनंदा कुंभार्डे व किरण गिरमे या दोघांना अधिक तपासा करीता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पैकी आनंदा कुंभार्डे हा सैन्य दलातील नोकरी सोडून आलेला तरुण आहे. तर किरण गिरमे याचा सुमारे वीस वर्षांपासून विंचूर येथे प्रिंटिंग प्रेस चार व्यवसाय सुरू होता. असे समजते.याप्रकरणी पुढील तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील,अपर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे, पोलिस उपनिरिक्षक दिलिप पवार , सपोनि प्रभाकर सहारे, हेमंत भालेराव, पराग गोतुर्णे, गंगाधर ढुमसे, हेमंत भालेराव, संतोष गवळी हे करित आहेत.

loading image
go to top