करंजवन धरणावर जॅकवेल उभारण्यासाठी सर्वेक्षण

अमोल खरे
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

मनमाड - मनमाड शहराची पाणीटंचाई दूर होण्यास आज खऱ्या अर्थाने पहिले पाऊल पडले असून, करंजवन ते मनमाड थेट पाईपलाईनचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याने करंजवन धरणावर जॅकवेल उभारण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करत जागा निश्चिती केली. या पाहणी दौऱ्यात पालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, मनमाड बचाव कृती समितीचे पदाधिकारी, पत्रकारांचा समावेश होता साधारण दोन वर्षात ही योजना पूर्ण होऊन मनमाड शहराला रोज पाणी मिळेल.

मनमाड - मनमाड शहराची पाणीटंचाई दूर होण्यास आज खऱ्या अर्थाने पहिले पाऊल पडले असून, करंजवन ते मनमाड थेट पाईपलाईनचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याने करंजवन धरणावर जॅकवेल उभारण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करत जागा निश्चिती केली. या पाहणी दौऱ्यात पालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, मनमाड बचाव कृती समितीचे पदाधिकारी, पत्रकारांचा समावेश होता साधारण दोन वर्षात ही योजना पूर्ण होऊन मनमाड शहराला रोज पाणी मिळेल.

देशात पहिल्यांदाच पिण्याच्या पाण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल झालेले मनमाड हे एकमेव शहर आहे. पाण्याचा शाश्वत स्रोत नसल्याने ४० वर्षांपासून येथे पाणीटंचाईने शहराचा विकास खुंटला गेला. त्यामुळे करंजवन पाणी योजना पुढे आली. मनमाड बचाव कृती समितीने न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या माध्यमातून करंजवन योजना गतिमान होण्यास मदत झाली. त्याला मनमाड नगर पालिकेने सर्वोतोपरी सहकार्य करत योजना तडीस नेण्यास कंबर कसली. 

करंजवन ही शाश्वत योजना असल्याने करंजवन ते मनमाड ८० किमीची थेट पाईपलाईन करण्याच्या दृष्टीने पालिकेने दहा लाख रुपये जीवन प्राधिकरणाला भरल्याने सर्वेक्षण पूर्ण झाले. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अभियंता बी. के. वानखेडे, डेप्युटी इंजिनिअर एन. एम. लोगांने, डेप्युटी इंजिनिअर बी. डी. परदेशी, सहाय्यक अभियंता एस एस थोरात, शाखा अभियंता ए. के. पाटील तसेच प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, गटनेते गणेश धात्रक, याचिकाकर्ते अशोक परदेशी, नगरसेवक पिंटू कटारे, पिंटू शिरसाठ, बब्बू कुरेशी, कैलास गवळी, रवींद्र घोडेस्वार, गंगादादा त्रिभुवन, विजय मिस्त्रा, विनय आहेर, मयूर बोरसे, दऊ तेजवानी, पापा थॉमस, गालिब शेख, नारायण पवार, पत्रकार अमोल खरे, बब्बू शेख, निलेश वाघ, अमीन शेख, गिरीश जोशी, सतिष शेकदार, भीमराव बिडगर, पुंडलिक कचरे, यांच्यासह पालिका अधिकारी आदींनी करंजवन धरणावर पाहणी करत जॅकवेल उभारण्यात येणाऱ्या जागेची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी धरणाच्या तीनही बाजूने पाहणी करत एका बाजूला स्थळ निश्चित केल्याने या योजनेचे आज खऱ्या अर्थाने पहिले पाऊल पडले न्यायालयाच्या आदेशानुसार योजनेच्या कामाला गती मिळाली आहे. पालखेड, पाटोदा योजना कायम ठेवून सध्याची लोकसंख्या २०१८ ते २०५१ च्या लोकसंख्येनुसार करंजवनमधून १३५ लिटर प्रतिमानसी पाणी मिळणार आहे. अडीजशे ते तीनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेच्या कामाचे जानेवारी पर्यंत टेंडर नोटीस होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. साधारण दोन वर्षात ही योजना पूर्ण होईल करंजवन येथे जॅकवेल व नवा जलकुंभ उभारण्यात येणार असून तेथून पाणी उचलण्यासाठी १०० हॉस्पॉवरच्या दोन पंपाद्वारे पाणी जलकुंभातून नैसर्गिक उताराने ७०० एमएमएस व्यासाच्या डीआय पाईपलाईनद्वारे थेट मनमाड येथे वागदर्डी धरणावर नव्याने बांधण्यात येणाऱ्या १५ एमएलटीच्या फिल्टरमध्ये घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पाईपलाईन रस्त्याच्याकडेने येणार असल्याने जमीन अधिग्रहणाचा विषय नसणार आहे.  

''सध्या शहरात पाणीटंचाई आहे पालिकेतर्फे १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा होतो. पाणी नसले तर वणवण भटकावे लागते पाण्याचे पंपिंग करावे लागते. त्यामुळे वीजबिलाचा कोट्यवधी रुपये खर्च येतो. करंजवन योजना पूर्ण झाल्यास ४० वर्षाचा पाणीप्रश्न मिटेल, पाणीटंचाईचे शहर ही ओळख पुसली जाईल, शहराचा विकास होईल औद्योगिकरण वाढेल, बेरोजगारी दूर होईल, नैसर्गिक उतराने पाणी येणार असल्याने नागरिकांना रोज मुबलक पाणी मिळेल पंपिंगवर होणारा कोटींचा खर्च वाचेल'' 

करंजवन धरणांची पाहणी करत जॅकवेल उभारण्यासाठी जागा निश्चित केली या योजनेच्या कामाचे जानेवारी पर्यंत टेंडर नोटीस होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात केली  जाईल अडीजशे ते तीनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे साधारण दोन वर्षात ही योजना पूर्ण होऊन मनमाड शहराला रोज पाणी मिळू शकते
- बी. के. वानखेडे, मुख्य कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नाशिक

करंजवन योजनेसाठी पालकमंत्री प्रमोद महाजन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली आहे सर्वस्तरावर प्रयत्न सुरू आहे सर्वेचे काम पूर्ण झाले असून आज जॅकवेलची जागा निश्चित करण्यात आली शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यास लवकरच कामाला सुरुवात होईल.
- राजेंद्र आहिरे, प्रभारी नगराध्यक्ष, गणेश धात्रक, गटनेते 

करंजवन मनमाडला तारणारी योजना आहे शासनाने योजनेला अधिक गती द्यावी यामुळे पाणीप्रश्न सुटेल नागरिकांना मुबलक पाणी मिळेल औद्योगिकरण होईल बेरोजगारांना काम मिळेल.
- अशोक परदेशी, जनहित याचिकाकर्ते

Web Title: Survey to build jackwell on Karanjwan dam