क्रॉपसॅप अंतर्गत कापूस, सोयाबिन, तुर पिकाचे होणार सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

येवला : पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कृषी विभागातर्फे यापूर्वी सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येत आहे. क्रॉपसॅप अंतर्गत खरीपा मध्ये कापुस,सोयाबिन व तुर या पिकाचे सर्वेक्षण कृषि सहाय्यक व शेतकरी मित्रांमार्फत होणार आहे.

येवला : पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कृषी विभागातर्फे यापूर्वी सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येत आहे. क्रॉपसॅप अंतर्गत खरीपा मध्ये कापुस,सोयाबिन व तुर या पिकाचे सर्वेक्षण कृषि सहाय्यक व शेतकरी मित्रांमार्फत होणार आहे.

आज तालुका कृषि अधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि दिन साजरा करण्यात आला.यावेळी कृषी विभागाने हि माहिती दिली. पंचायत समितीच्या सभापती नम्रता जगताप अध्यक्षस्थानी होत्या. प्रथम वसंतरावजी नाईक व सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जगताप यांच्या हस्ते जमिन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात येवुन त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

१३ कोटी वृक्ष लागवड अभियान अंतर्गत जगताप यांच्या यांचे हस्ते कृषि चिकीत्सालय परिक्षेत्रावर नारळ रोपाची लागवड करुन सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.कृषि दिनाचे औचित्य साधुन तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत तालुक्यातील शेतकरी मित्र व कृषि सहाय्यक यांचे क्रॉप संर्दभात येत्या हंगामात करावयाच्या कामाचे नियोजन करण्यात आले. क्रॉपसप अंतर्गत पिकाचे सर्वेक्षण होणार असून त्यासाठी मंडळ कृषि अधिकारी डी.जी. गायके यांनी मोबाईल अॅपच्या वापराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रामुख्याने एकात्मिक किड व्यवस्थापनावर भर देण्याबाबत शेतकरी मित्रांना व शेतकज्यानां आव्हान केले.शेतकरी मित्र विनायक भोरकडे,प्रमोद भागव, नंदु पुणे यांनी मनेागत व्यक्त केले. तालुका कृषि अधिकारी अभय फलके यांनी क्रॉपस्ॉप योजनेचे महत्व सांगितले. येत्या हंगामात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या आठवडयात शेतकरी मित्र व कृषि सहाय्यक यांची एकत्रित सभा घेवुन मार्गदर्शन करण्याचे सर्वानुमते ठरले.सुत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक हितेंन्द्र पगार यांनी केले. कृषि पर्यवेक्षक भाऊसाहेब काळोखे, प्रभारी मंडळ कृषि अधिकारी भाऊसाहेब पाटोळे, प्रभारी मंडळ कृषि अधिकारी मुकुंद चौधरी,कृषि विस्तार अधिकारी उमेश सुर्यवंशी व इतर कृषि सहाय्यक उपस्थित होते.संतोष गोसावी यांनी आभार मानले.

Web Title: survey of cotton beans and pulse under cross cap