डहाके, कोळगावकर, धुप्पड, कोतवालांसह वसेकर, पाटील यांना सूर्योदय पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

जळगाव - सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे मराठी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्यांना सूर्योदय वाङ्‌मय पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. मंडळातर्फे यंदाचे पुरस्कार जाहीर  झाले असून, चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण करण्यात येतील.

सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष  वसंत आबाजी डहाके यांना सातव्या वर्षाचा अखिल भारतीय दलूभाऊ जैन साहित्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. २१ हजार रुपये, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (स्व.) सौ. बदामबाई हेमराज देसर्डा, प्रा. पन्नालाल भंडारी, इंदरचंद लालचंद देसर्डा यांच्या स्मरणार्थ चौदाव्या वर्षाचा सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार कवयित्री माया धुप्पड यांना देण्यात येईल. कवी अशोक कोतवाल यांना सौ. कांताबाई भवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ अकराव्या वर्षाचा सूर्योदय सेवा पुरस्कार, श्रीमती रामकुवरबाई इंदरचंद देसर्डांच्या स्मरणार्थ चौदावा अक्षररत्न पुरस्कार कवी उत्तम कोळगावकर (नाशिक), लीलाबाई दलिचंद जैन बालसाहित्य पुरस्कार लेखक प्रा. विश्‍वास बसेकर यांना, तर गोकुळचंद्र लाहोटींच्या स्मरणार्थ सूर्योदय सेवाव्रती पुरस्कार प्रा. महेंद्र पाटील यांना जाहीर करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी कळविले आहे.

Web Title: suryoday award declare