संशयितांच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे हाती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

नाशिक : आदिवासी विकास विभागात शिक्षकांच्या बोगस नोकरीप्रकरणी पोलिसांनी आदिवासी आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्राथमिक पातळीवर चौकशी केली असली, तरी लवकरच या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा फास आवळला जाणार आहे. संशयितांच्या चौकशीदरम्यान त्यांच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.

मुंबई नाका पोलिसांत गेल्या आठवड्यात आदिवासी विकास विभागात शिक्षकाच्या नोकरीसंदर्भात लाखो रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या चार संशयितांनी आदिवासी विकास विभागाचे हुबेहूब बनावट संकेतस्थळ तयार करून त्याद्वारे अनेक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींना फसविले. या प्रकरणात आदिवासी विकास विभागातील अधिकारीही सामील असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी आदिवासी विकास विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशी केली. पोलिसांनी आदिवासी विकास विभागाला भेट देऊन संशयितांची कुणाशी आणि कोण-कोणत्या ठिकाणी ऊठबस वा जाणे-येणे होते याचीही सखोल माहिती घेतली. त्याचप्रमाणे या टोळीचा सूत्रधार हेमंत पाटील ऊर्फ अमित लोखंडे, सुरेश पाटील, तुकाराम पवार यांच्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Web Title: suspect's mobile leaves trace adivasi murder case