भुजबळांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्याला निलंबित करा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

सटाणा : श्रीगोंदा (जि. नगर) येथील एका इसमाच्या घरी जाऊन दमदाटी करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल अश्लाघ्य भाषा वापरून शिवीगाळ केली. शासनाने या गंभीर बाबीची दखल घेउन उपनिरीक्षक जाधव यांना तात्काळ निलंबित करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बागलाण तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आज मंगळवार (ता.१२) रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

याबाबत समता परिषदेचे विभागीय संघटक धर्मराज खैरनार व तालुकाध्यक्ष संजय बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज बागलाणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात, तीन दिवसांपूर्वी पहाटे तीन वाजेच्या सुमारास भीमराव बापूराव नलगे (रा. कोसेगव्हाण, ता.श्रीगोंदा, जि.नगर) यांच्या घरी श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव गेले आणि त्यांना दमदाटी व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच, या घटनेशी काहीही संबंध नसतांना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने अवमानकारकरित्या शिवीगाळ केली. तरी महावीर जाधव यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा समता परिषदेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष भरत खैरनार, दादाजी खैरनार, सोमनाथ शेलार, सागर शेलार, सुनील महाजन, लखन पवार, भरत पवार, राजेंद्र पवार, पुंडलिक रौंदळ, गोपीनाथ मोहन, राकेश येवला, रवींद्र सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Suspend the defamatory statement about Bhujbal