'त्या' पोलीस पाटलाचे निलंबन

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

चांदवडचे पोलीस पाटील दिपक ठाकरे यांनी पदाचा दबाव वापरुन भावाच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरील उत्पन्न कमी न लावल्यामुळे तलाठी मिलींद गुरुबा यांस बेदम मारहाण केली. याची फिर्याद तलाठी गुरुबा यांनी चांदवड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर 'सकाळ' डिजीटलने बातमी प्रसिध्द करताच याची दखल घेत संबधित पोलीस पाटलास चांदवड प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी त्यांना पदावरून हटवत निलंबित केले.  

नाशिक : चांदवड तालुक्यातील काजीसांगवी येथील पोलीस पाटील दिपक ठाकरे यांनी गावात तलाठी कार्यालयात काम करणा-या तलाठी मिलींद गुरुबा यांस बेदम मारहाण केली. पोलीस पाटील दिपक ठाकरे याने पदाचा दबाव वापरुन भावाच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरील उत्पन्न कमी न लावल्यामुळे बेदम मारहाण केली अशी फिर्याद तलाठी गुरुबा यांनी चांदवड पोलीस ठाण्यात दिली होती. 'सकाळ' डिजीटलने बातमी प्रसिध्द करताच याची दखल घेत संबधित पोलीस पाटलास चांदवड प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी त्यांना पदावरून हटवत निलंबित केले.  

उत्पन्न कमी न लावल्यामुळे केली होती मारहाण 
मिलींद गुरुबा हे काजीसांगवी येथील तलाठी कार्यालय दैनदिन कामकाज करत असतांना पाटील दिपक ठाकरे हे तलाठी कार्यालयात आले असता त्यांनी आपल्या भावासाठी उत्पन्नाचा दाखला मागितला. त्यावर तलाठी यांनी भाऊ काय करतात असे विचारले. तेव्हा त्याचे भाऊ घोटी येथे शिक्षक असल्याचे सांगतले. त्यावर तलाठी यांनी मला त्यांचा १६ नंबरचा फॉर्म भरुन हवा आहे. यावर दिपक ठाकरे मी गावाचा पाटील आहे. तुला समजत नाही का असे म्हणून तु मला उत्पन्नाचा दाखल दे असे म्हणू लागला. यावर तलाठी यांनी मी देऊ शकत नाही. मला सरकारी नियमात राहून काम करावे लागते. असे सांगितले. यावर दिपक ठाकरे यांनी चिडून तलाठी गुरुबा यांचा हात पिळून त्यांच्या पोटावर जबर मारहाण केली. पाटील ठाकरे एवढ्यावर थांबले नाही तर तुला मी येथून काढून तर देईल परंतु गुरबा यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

उपजिल्हाधिकारी सिध्दार्थ भंडारेंकडून कारवाईचे आश्वासन

यानंतर तलाठी मिलींद गुरुबा यांनी चांदवड पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल केला. चांदवड पोलीस ठाण्यात आलेल्या पोलीस उपअधिक्षकांची संघटनेने भेट घेवून सरकारी कर्मचा-यावर गावातील पाटलाने मारहाण केली असून यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर आम्ही त्वरीत संबंधीत पाटलावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपअधीक्षक साळवे यांनी दिले. पोलीस पाटील यांच्यावर आम्ही त्वरीत कारवाई करणार असून यात दोषी आढळ्यास पोलीस पाटील पद रद्द करण्यात येईल असे यावेळी उपजिल्हाधिकारी सिध्दार्थ भंडारे यांच्याकडून सांगण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspension of police misbehaved to government employee