Dhule News : अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू

Death news
Death newsesakal

पिंपळनेर (जि. धुळे) : येथील वडारवाडीमधील १६ वर्षीय राजश्री मंजूळकर या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून, तिचा मृतदेह विच्छेदनासाठी धुळे येथे पाठविण्यात आला आहे. पिंपळनेर पोलिस कसून तपास करीत आहेत. (Suspicious death of minor girl Dhule News)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Death news
Satara Crime News: सोने लुटणाऱ्या दोघा बिहारींना अटक

पिंपळनेर पोलिसांत मुलीच्या मामांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, की शहरातील वडारवाडीमधील रहिवासी राजश्री रामदास मंजूळकर (वय १६) हिला १२ मार्चला सकाळी साडेआठच्या सुमारास मंजुळाबाई कासूरकर हिने आवाज दिला परंतु तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही व हालचालदेखील केली नाही.

ती बेशुद्धावस्थेत पडलेली आहे असे कळविले असता फिर्यादी पिराजी शिवराम कासूरकर (वय ४०) यांनी खासगी वाहनाने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. भामरे यांनी तिला मृत घोषित केले.

राजश्रीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून, तिचा मृतदेह विच्छेदनासाठी धुळे येथे पाठविण्यात आला. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे घटनास्थळी दाखल झाले. पोविस उपनिरीक्षक पी. पी. सोनवणे तपास करीत आहेत.

Death news
Pune Crime : धक्कादायक! भर रस्त्यात चुंबन घेतलं अन् म्हणाला लग्न कर नाही तर...तरुणावर गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com