स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सातबारा उताऱ्याची होळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

अंबासन : स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्या यांनी शेतकरी कर्जमाफीविरोधात विधान केले, तसेच सरकार कर्जमाफीबाबत गंभीर नाही, याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी करीत सातबारा उताऱ्यांची होळी केली.

कर्जमाफीसाठी राज्यकर्त्यांकडून अनेक राजकीय खेळी खेळल्या जात आहेत. त्यात स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी आगीत तेल ओतले असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शेतीवरील कर्जमाफीच्या विरोधात विधान केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातबाराच्या प्रतींची होळी केली. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे', "अरुंधती भट्टाचार्या हाय हाय,' अशा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. शासनाने कर्जमाफीवर लवकरच विचार करावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. दशरथ कोर, सतीश आहिरे, अनिल भामरे, गंजीधर कोर, साहेबराव शिंदे, चिकू आहिरे, भाऊसाहेब कोर आदी शेतकरी उपस्थित होते.
 
Web Title: Swabhimani Sanghatna protest for loan waiver