वैष्णव जन तो तेने कहिये... 

किरण सुर्यवंशी : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

चणकापुर येथील हुतात्मा स्मारकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून वनविभाग, जि.प.शाळा व ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या विचारांची सतत आठवण रहावी या हेतूने,वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात गांधीजींनी स्वतःच्या हाताने लावलेल्या पिंपळ वृक्षांपासून तयार केलेल्या रोपांची हुतात्मा स्मारक परिसरात लागवड करण्यात आली.जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक मुक्त अभियानाची शपथ घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने शालेय,हुतात्मा स्मारक व संपूर्ण गावातून स्वच्छता अभियान राबवत जनजागृती केली.

अभोणा : चणकापुर येथील हुतात्मा स्मारकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून वनविभाग, जि.प.शाळा व ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या विचारांची सतत आठवण रहावी या हेतूने,वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात गांधीजींनी स्वतःच्या हाताने लावलेल्या पिंपळ वृक्षांपासून तयार केलेल्या रोपांची हुतात्मा स्मारक परिसरात लागवड करण्यात आली.जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक मुक्त अभियानाची शपथ घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने शालेय,हुतात्मा स्मारक व संपूर्ण गावातून स्वच्छता अभियान राबवत जनजागृती केली

.यावेळी कळवण,कनाशी,जयदर,दळवट,देसगाव वनविभागाचे अधिकारी राहुल घरटे, वसंत पाटील, एन.के.बदादे, एस.एस.भोये, डी.एन.बडे, एस.पी.हिरे, श्रीम.एल.सी.ठाकरे, डी.सी.गुंजाळ, आहेर, कोंडे, सरपंच ज्ञानदेव पवार, विनोद गांगुर्डे, मुख्याध्यापक दिलीप शिसोदे, चंद्रकला कुंदे, अंगणवाडी सेविका काझी व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

अभोणा विद्यालयात स्वच्छता अभियान

डांग सेवा मंडळ (नाशिक) संचालित जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त संपूर्ण शालेय व गावातील परिसर स्वच्छता अभियानांतर्गत स्वछ व प्लॅस्टिक मुक्त करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब मराठे यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिमा पूजनाने विध्यार्थ्याच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्यात. प्राचार्य नंदकिशोर बधान,उपमुख्याध्यापक प्रशांत कोष्टी यांनी मार्गदर्शन केले. प्रा.किरण सूर्यवंशी यांनी प्लॅस्टिक मुक्त अभियानाची शपथ देऊन सूत्रसंचालन केले .आभार प्रदर्शन सचिन कुलकर्णी यांनी केले .यावेळी उपप्राचार्य यशवंत कुलकर्णी,पर्यवेक्षिका सुनंदा थोरात ,अधीक्षक दिलीप सावकार विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swacchta abhiyan in abhona