स्वामी विवेकानंदांसह राजमाता जिजाऊंना वंदन 

jijau jayanti
jijau jayanti

चाळीसगाव - गिरणा परिसरातील विविध संस्था व संघटनांतर्फे ठिकठिकाणी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने प्रतिमा पूजन, विद्यार्थ्यांची भाषणे, विविध स्पर्धांसह प्रबोधनपर रॅलीचे आयोजन करण्यात आले. 

महाविद्यालय 
येथील महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय व सम्राट अशोक अध्यापक विद्यालयात प्रा. धर्मेंद्र जाधव यांनी प्रतिमा पूजन केले. प्रा. राजेश ढाके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. मीनाक्षी दोडके, प्रा. शामली थोरात, प्रा. दीपिका खैरनार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. 

संभाजी सेना 
संभाजी सेनेतर्फे जिजाऊ जयंतीसह संभाजी सेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी प्रतिमा पूजन केले. याप्रसंगी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संचालक विश्‍वास चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, डॉ. अजय पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, संजय सोनवणे, रणजित पाटील, प्रकाश जाधव, आधार केंद्राच्या अध्यक्षा ऍड. आशा शिरसाठ, डॉ. भाग्यश्री शिनकर, अर्जुन मोरे, डॉ. चेतना कोतकर, पंचायत समितीच्या सभापती आशालता साळुंखे, माजी नगरसेविका प्रतिभा चव्हाण, रमेश पोतदार आदी उपस्थित होते. संभाजी सेनेचे संस्थापक लक्ष्मण शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. विजय गवळी यांनी प्रास्ताविक तर गिरीश पाटील यांनी आभार मानले. डॉ. ज्योती पाटील, डॉ. अजय पाटील, विमल पाटील, स्मिता पाटील, मालजी जाधव, लता दौंड, अलका मोरे, छाया मोरे, प्रतिभा पाटील, अविनाश काकडे, दिवाकर महाले, राहुल अहिरे, प्रवीण पाटील, सुनील पाटील, आधार महाले, रवींद्र शिनकर, अरुण रोकडे, गजानन चंदनशीव, बंटी पाटील, विजय देशमुख, भरत नेटारे आदी उपस्थित होते. 

युवा प्रतिष्ठान, उंबरखेड 
उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे मालेगाव येथील सेवा रक्तपेढीच्या सहकार्याने आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात 53 युवकांनी रक्तदान केले. सरपंच किसन गायकवाड, बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील, जिल्हा दूध संघाच्या संचालिका सुनीता पाटील, सर्वोदय शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रकाश पाटील, टाकळी प्र. दे. येथील रोहन सूर्यवंशी, प्रशांत पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश कर्पे, धनंजय निकम, सचिन पाटील, प्रदीप पाटील व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. वासुदेव अहिरे यांनी सूत्रसंचालन तर अविनाश कर्पे यांनी आभार मानले. 

जिजाऊ महिला मंडळ 
येथील जिजाऊ महिला मंडळातर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. जुना मालेगाव रोडपासून एल. आर. पाटील, उड्डाण पूल, भडगाव रोड, कचेरीवरुन शासकीय विश्रामगृहावर समारोप झाला. मंडळाच्या संस्थापिका मनीषा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दीपाली राणा, माधुरी भामरे, मीना गायकवाड, उज्ज्वला ठोंबरे, रंजना पाटील, प्रतिभा देसले, भारती पाटील, माया सावंत यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

मेहुणबारे आश्रमशाळा 
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील आदिवासी आश्रमशाळेत मुख्याध्यापक वैभव चौधरी अध्यक्षस्थानी होते. प्राथमिकचे मुख्याध्यापक मुकेश चौधरी व अशोक चौधरी प्रमुख पाहुणे होते. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अनिता शिंदे, विक्रम महाले, यु. एस. महाजन व शिक्षक उपस्थित होते. भूषण पाटील यांनी आभार मानले. 

विसापूर आश्रमशाळा 
विसापूर तांडा (ता. चाळीसगाव) येथील आश्रमशाळेत संस्थेच्या कोशाध्यक्ष तथा टाकळी प्र. दे. ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पांजली पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. मुख्याध्यापक जी. पी. जाधव यांनी प्रास्ताविक केले. आर. एन. पाटील व एस. जे. कदम यांनी मनोगत व्यक्त केले. एन. एफ. राठोड यांनी सूत्रसंचालन केले. ए. पी. ठोंबरे यांनी आभार मानले. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 

शाहीर परिषद 
नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील महाराष्ट्र शाहीर परिषद व लोकरंग फाउंडेशनतर्फे झालेल्या कार्यक्रमात शिवनारायण जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. शाहीर शिवाजीराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विनोद राऊळ, मोहन तावडे, रवींद्र पाटील, नामदेव सोन्नी, बाबूराव मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

कुणबी परिषद 
पाचोरा येथील राजीव गांधी कॉलनीत कुणबी परिषदेचे जिल्हा संघटक संदीप दादा पवार यांनी प्रतिमा पूजन केले. याप्रसंगी गो. से. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुरेश पवार, कुणबी परिषदेचे अध्यक्ष चिंतामण पाटील, पुनगावचे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, प्रमोद पाटील, गुलाब कोळी, केवल पाटील, भूषण पाटील, सचिन पाटील, अमोल सपकाळ, योगेश पाटील आदी उपस्थित होते. 

पिंपळगाव हरेश्‍वर 
पिंपळगाव हरेश्‍वर (ता. पाचोरा) येथील ग्रामविकास विद्यालयात मुख्याध्यापक एम. जे. पांडे, उपमुख्याध्यापिका एस. जे. बडगुजर, पर्यवेक्षक के. एम. बडगुजर, पी. एस. महाजन यांनी प्रतिमा पूजन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या बालसभेचे आयोजन उपशिक्षक रणजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी प्रियंका चित्ते, साक्षी सूर्यवंशी, अनुश्री पाटील, कामिनी मालकर, प्रज्ञा महाजन, प्राजक्ता क्षीरसागर, हर्षदा ढाकरे यांची स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंच्या जीवनावर भाषणे झाली. कशिश सरोदे व हिमानी माने यांनी सूत्रसंचालन केले. कल्याणी सपकाळ हिने आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com