'ज्वलंत हिंदूत्व' ग्रुपच्या विद्यार्थ्यांकडून अपंग कल्याण केंद्रातील मुलांना मिठाई वाटप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूलमधील ज्वलंत हिंदूत्व ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी काकासाहेब भामरे निवासी अपंग कल्याण केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सटाणा - येथील बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूलच्या इयत्ता दहावीतील 'ज्वलंत हिंदूत्व' ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी येथील अपंग कल्याण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना मिठाई व शालोपयोगी साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

बेस्ट इंग्लिश मिडीअम स्कूलमधील 'ज्वलंत हिंदूत्व' ग्रुपच्या सिध्देश बागड, सम्यक राका, सारंग पाटील, दिपराज जाधव, पवन पगार, आोम जाधव, हिमांशू बंब, चैतन्य येवला, ओम अहिरे, हितेश मेतकर या विद्यार्थ्यांनी शहरातील नामपूर रस्त्यावरील काकासाहेब भामरे निवासी अपंग कल्याण केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मिठाई व शालोपयोगी साहित्य भेट स्वरुपात दिले. यावेळी बोलताना ग्रुपचा प्रमुख सिध्देश बागड म्हणाला, शाळेत जातांना किंवा येताना रस्त्यावर काही दिव्यांग मुले - मुली नेहमी दिसायचे. जन्मतःच शरीरात व्यंग असल्याने दिव्यांग मुलांना इतर सर्वसामान्य मुलांसारखे जीवन जगणे कठीण होऊन जाते. त्यांना अभ्यास करणे, खेळणे तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करताना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असतो. आपण समाजासाठी काहीतरी देण लागतो या उक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्ती व मुला - मुलींसाठी काहीतरी करायचे असे मनात ठरवून अपंग कल्याण केंद्रातील दिव्यांगांना मदत द्यावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी केल्याचे बागड याने यावेळी सांगितले. 

'ज्वलंत हिंदूत्व' ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केंद्राचे व्यवस्थापक बाळासाहेब गिरी यांच्याकडे मिठाई व शालोपयोगी साहित्य सुपूर्द केले. यावेळी अधीक्षिका सविता बावा, डॉ.मुकेश पाटील, अरुण सोनवणे, सुरेखा भामरे, नवनाथ दहादडे, कल्याणी बधान, अनिता पवार, केवील वळवी, राहुल सोनवणे, शरद पवार आदी उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Sweets donation of students from Jwalanta Hindutva group to disabled welfare center