मालेगावच्या वृद्धेचा स्वाइन फ्लूने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नाशिक - वजीरखेडे (ता. मालेगाव) येथील 65 वर्षीय वृद्धेचा आज सायंकाळी स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.  त्यांच्यावर चार दिवसांपासून नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आत्तापर्यंत स्वाइन फ्लूमुळे जिल्ह्यात 29 रुग्ण दगावले असून, या महिन्यातील हा चौथा रुग्ण आहे. 

कमळाबाई कौतिक पाटील (65, रा. वजीरखेडे, ता. मालेगाव, जि. नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. कमळाबाई पाटील यांना 11 एप्रिलपासून त्रास होत होता. सुरवातीला त्यांना मालेगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर  शुक्रवारी (ता. 14) त्यांना नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयातील त्यांचा स्वाइन फ्लूचा वैद्यकीय अहवाल सकारात्मक आला होता. आज दुपारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात  हलविण्यात आले असता, सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. 

जिल्हा रुग्णालयाच्या स्वाइन फ्लू कक्षात आज एक पुरुष व तीन महिलांसह चार रुग्ण दाखल आहेत. या चारही रुग्णांचा  वैद्यकीय अहवाल अद्यापपर्यंत आलेला नाही. आत्तापर्यंत स्वाइन फ्लूमुळे जिल्ह्यात 29 रुग्ण दगावले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना नऊ रुग्ण दगावले आहेत. तर खासगी रुग्णालयांमध्ये 20 रुग्ण दगावले आहेत.

Web Title: swine flu death

टॅग्स