स्वाइन फ्लूचा पुन्हा फैलाव; जिल्ह्यात तिघांचा साथीने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

नाशिक - दोन महिन्यांपासून वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत असताना स्वाइन फ्लूचादेखील प्रादुर्भाव वाढत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाला. जानेवारी ते 15 मार्चपर्यंत शहरात एकूण 18 स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले असून, त्यातील तिघे या आजाराने मरण पावले. मृत रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

बागलाण तालुक्‍यातील नामपूर येथील मधुकर बच्छाव, सटाणा येथील किसान सोनवणे, सिन्नर तालुक्‍यातील सांगवी येथील कांचन हजारे यांचा स्वाइन फ्लूने खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जानेवारीत एक, फेब्रुवारीत तीन, तर मार्चमध्ये 14 असे एकूण अठरा स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील चांदोरी, सिन्नर तर शहरी भागातील पखाल रोड, पिंपळगाव बहुला, सिडको व अशोकनगर भागात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला.

Web Title: swine flu in nashik