स्वाईन फ्ल्युचे सव्वा तीन महिन्यात 25 बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

नाशिक : वाढत्या उष्णतेमुळे स्वाईन फ्ल्युचा धोका कमी झाल्याचे सांगितले जात असले, तरी गेल्या सव्वा तीन महिन्यांमध्ये स्वाईन फ्ल्युची लागण झाल्याने 25 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये नाशिक महापालिका क्षेत्रात 18 जणांचा समावेश आहे. तर, 203 जणांना स्वाईन फ्ल्युची लागण झाली होती. गेल्या 2018 या वर्षभरात स्वाईन फ्ल्युमुळे 76 जणांचा बळी गेला होता.

नाशिक : वाढत्या उष्णतेमुळे स्वाईन फ्ल्युचा धोका कमी झाल्याचे सांगितले जात असले, तरी गेल्या सव्वा तीन महिन्यांमध्ये स्वाईन फ्ल्युची लागण झाल्याने 25 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये नाशिक महापालिका क्षेत्रात 18 जणांचा समावेश आहे. तर, 203 जणांना स्वाईन फ्ल्युची लागण झाली होती. गेल्या 2018 या वर्षभरात स्वाईन फ्ल्युमुळे 76 जणांचा बळी गेला होता.

नाशिकमध्ये गेल्या जानेवारीमध्ये स्वाईन फ्ल्युने एक रुग्ण दगावल्यानंतर फेब्रुवारीमध्ये मात्र स्वाईन फ्ल्युने डोके वर काढले होते. जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये विशेष स्वाईन फ्ल्यु कक्ष सुरू करण्यात आला. त्यानंतर याठिकाणी गेल्या जानेवारी ते आजपर्यंत (ता.8) स्वाईन फ्ल्यु सदृश्‍य तापाच्या 2 हजार 944 रुग्णांवर उपचार करण्यात आले असता, त्यापैकी 18 रुग्णांना स्वाईन फ्ल्युची लागण झाली होती. त्यापैकी 6 रुग्ण हे जिल्हा रुग्णालयाच्या स्वाईन फ्ल्यु विशेष कक्षामध्ये दगावले आहेत. त्याचप्रमाणे नाशिक महापालिका हद्दीमध्ये स्वाईन फ्ल्यु सदृश्‍य तापाचे 682 रुग्णांवर उपचार करण्यात आले असता, त्यामध्ये 185 रुग्णांना स्वाईन फ्ल्युची लागण झाली होती. त्यापैकी 18 रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये दगावले आहेत. तर एक रुग्ण मालेगाव सामान्य रुग्णालयात आणत असताना दगावला होता. नाशिक शहर व जिल्ह्यात गेल्या सव्वा तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये 25 रुग्ण हे स्वाईन फ्ल्युमुळे दगावले आहेत. यातही 5 रुग्ण हे परजिल्ह्यातील आहेत. परंतु त्यांचा उपचारादरम्यान नाशिकमध्ये मृत्यु झाला. यात अहमदनगर जिल्ह्यातील 4 आणि जळगाव जिल्ह्यातील 1 अशा 5 रुग्णांचा समावेश आहे. गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यात 76 तर 2017 मध्ये 91 रुग्ण स्वाईन फ्ल्युचे बळी ठरले होते.

दगावलेले रुग्ण
सिन्नर (1), निफाड (4), मालेगाव (3), येवला (1), नाशिक (2), नांदगाव (1), नाशिक महापालिका हद्द (5), मालेगाव महापालिका हद्द (2), मनमाड पालिका (1), नगर जिल्हा (4), जळगाव जिल्हा (1). एकूण -25

स्वाईन फ्ल्युच्या विषाणूला पोषक वातावरण निर्मिती झाली की त्याचा फैलाव होतो. थंडी आणि उन्हाळा सुरू होण्याच्या काळात जो वातावरणात बदल झाला त्याचा परिणाम स्वाईन फ्ल्युचा फैलाव होण्यात झाला. आता वातावरणात प्रचंड उष्णता असल्याने धोका कमी आहे. मात्र स्वाईन फ्ल्युच्या लक्षणांकडे दूर्लक्ष न करता तातडीने नजिकच्या रुग्णालयात उपचार घेणे गरजेचे आहे.
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय.

Web Title: Swine flue kills 25 peoples